Deputy Chief Minister Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

महात्मा जोतिराव फुले (Mahatma Jyotirao Phule) शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत मंगळवारी राज्यातील 18 लाख 89 हजार 528 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 11 हजार 966 कोटी 21 लाख रुपयांची कर्जमाफी रक्कम जमा करण्यात आली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माहिती दिली आहे.

यात जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून 10 लाख 40 हजार 935 शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार 407 कोटी 13 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच व्यापारी बँकांच्या माध्यमातून 8 लाख 48 हजार 593 शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार 559 कोटी 80 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. (हेही वाचा - Coronavirus: महाराष्ट्रात आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा बळी, मुंबईत 16 तर पुण्यात 2 नव्या रुग्णांची नोंद; राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 320 वर पोहचला)

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी 24 फेब्रुवारी रोजी जाहीर झाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन महिन्यात कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले आहे. मंगळवारी राज्यातील 18 लाख 89 हजार 528 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारला दिलासा मिळाला आहे.