Aurangabad Crime: मित्राच्या निधनानंतर तरुणाची आत्महत्या, औरंगाबाद येथील घटना
Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मित्राच्या निधानानंतर त्याच्या आठवणीत व्याकूळ झालेल्या तरुणाने आत्महत्या (Suicide ) करत आपले आयुष्य संपवले आहे. औरंगाबाद (Aurangabad Crime) येथील सातारा परिसरातील संत रोहिदास हौसिंग सोसायटीत ही घटना घढली. चेतन दिलीप बनस्वाल असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो 28 वर्षांचाआहे. त्याच्या मित्राचे आठवडाभरापूर्वीच आजारपणात निधन झाले होते. या निधनामुळे चेतन यास मोठा धक्का बसला होता. माझा मित्र मला बोलवत आहे. मलाही त्याच्याकडे जायचे आहे, असे तो सातत्याने सांगत होता. अखेर त्याने आत्महत्या केली.

चेतन बनस्वाल याने घरातील छताच्या पंख्याला साडाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने संगणकशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतले होते. चेतनने ज्या मित्राच्या निधनानंतर आत्महत्या केली त्याचे नाव समजू शकले नाही. मात्र, या मित्राच्या निधानंतर माझा मित्र मला बोलवतो आहे. त्याला भेटण्यासाठी मला जायचे आहे, असे चेतन वारंवार बोलत असे. त्यानंतर त्याने खरोखरच आत्महत्या केली. (हेही वाचा, हेही वाचा Bangalore Suicide Case: बेंगळुरूमध्ये कोरोनामुळे पती गमावला, नैराश्यातून दोन मुलांसह पत्नीची आत्महत्या)

घरातील खोलीत पंख्याच्या छताला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत चेतनचा मृतदेह आढळून आला. दोन्ही मित्रांच्या निधनाने त्यांचे कुटुंबीय दु:खात लोटले गेले आहे. एकाचे निधन आणि दुसऱ्याची आत्महत्या यामुळे दोन्ही मित्रांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.