Maharashtra Weather Forecast: वर्षाच्या शेवटी महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट
Maharashtra Weather | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) महाराष्ट्रात 27 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. मध्य भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 28 आणि 29 डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या संदर्भात हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथे 26 ते 29 डिसेंबरदरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 27-28 डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये आणि 27-29 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Tweet

महाराष्ट्रात कुठे पाऊस पडण्याची शक्यता

राज्यात 28 डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, जळगाव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो. ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजेच 27 डिसेंबरला विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. तसेच, विदर्भ आणि मराठवाड्यात 29 डिसेंबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यात पाऊस पडू शकतो. (हे ही वाचा Atal Mahashakti Abhiyan: मोदी सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी भाजप कार्यकर्ते घरोघरी जाणार, चंद्रकांत पाटीलांची माहिती.)

Tweet

महाराष्ट्रातील या भागात थंडीची तीव्रता 

नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली आहे. रात्री तापमानात झपाट्याने घट होते. सकाळी थंडी जाणवते. रब्बी पिकांसाठी थंडीची वाढ चांगली मानली जाते. निफाड तालुक्यातही उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडी वाढली आहे. महाराष्ट्रात गेल्या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे प्रंचड पीक खराब झाले. ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकं वाहून जाण्याचा तसेच त्याच्यावर कीड पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.