Maharashtra Weather Update: राज्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. आज राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊसाची एन्ट्री होणार आहे असा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. राज्यात पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिर आणि सिधुंदुर्ग भागात वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी नागरिकांना उष्णतेपासून सूटका मिळाली आहे. बदलत्या हवामान पाहून हवामान विभागाने काही ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. (हेही वाचा- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस दाखल, हवामान विभागाकडून यलो अलर्ट
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील धुळे, नंदुरबार जळगाव, नाशिक,छ. संभाजीनगर, बीड, जालना, परभणी हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस असणार आहे. उत्तर कोंकणातील काही भागात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोटाट्याचा वारा (50-60 वर्ग, मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील पालघर आणि ठाण्यामध्ये उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटसह ताशी ४० ते ५० किलोमीटर होत आहे. हवामान विभागाने कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीच्या लगत राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.