Sindhudurg Rain: राज्यातील काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे. कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळसह अनेक ठिकाणी पावसाची जोरदार एन्ट्री सुरु झाली आहे. राज्यात काही विभागात ढगाळ वातावरण झाले आहे. आता नागरिकांची उष्णतेपासून सुटका होणार आहे. हवामान विभागाने कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीच्या लगत राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. (हेही वाचा- पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते हलक्या सरी, 'या' ठिकाणी उष्णतेची लाट)
#WATCH | सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. pic.twitter.com/0yf8PzrRGM
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)