महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Mahatma Jotirao Phule Farmers Debt Relief Scheme) 2020-21 साठी 7 हजार कोटींचा निधी अर्थसंकल्पित केला आहे. या निधीतून यापूर्वी वितरीत केलेला निधी वगळता 1 हजार 306 कोटी इतका निधी वितरीत करण्यास आज शासनाने मान्यता दिली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील 25.77 लाख खातेदारांना 16 हजार 690 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. यासंदर्भात सहकारमंत्री (Minister of Co-operation) बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च, 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या. तसेच, या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन/फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019’ ही कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना देशासह राज्यात कोरोना व्हायरसचे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला. (हेही वाचा - UGC, राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत चर्चा करुनच परीक्षा न घेण्याचा निर्णय- उदय सामंत)
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन २०२०-२१ साठी ₹ ७००० कोटींचा निधी अर्थसंकल्पित केला आहे. या निधीतून यापूर्वी वितरीत केलेला निधी वगळता ₹ १,३०६ कोटी इतका निधी वितरीत करण्यास आज शासनाने मान्यता दिली आहे.
अधिक माहितीसाठी: https://t.co/ghiBZFxo2i pic.twitter.com/0qNtJ5BgpZ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 9, 2020
मात्र, या कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीला आता गती देण्यात आली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, असे बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले आहे.