Uday Samant | (File Photo)

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत चर्चा करुनच अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशीही चर्चा केली. युजीशीसोबतही बोलणे झाले. त्यानंतरच हा निर्णय घेतला, असे सांगत विद्यार्थ्यांना तरी किती दिवस संभ्रमात ठेवणार ? असा सवालही उच्च तंत्रशिक्षण मंत्री (HRD Minister) उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. राज्यातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते बोलत होते.

या वेळी बोलताना उद्य सामंत म्हणाले की,  विद्यार्थ्यांना फार काळ संभ्रमावस्थेत ठेवता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि त्यांचे आरोग्य या दृष्टीनेच परीक्षा न घेण्याबाबतची भूमिका आम्ही मांडली होती. मात्र, यूजीसीनं सप्टेंबर अखेरिस परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. यूजीसीच्या निर्णायमुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रमावस्था अधिक वाढली आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना उदय सामंत यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत राज्यातील कुलगुरु आणि शिक्षण क्षेत्रातील इतर मान्यवर यांच्यासोबत आमच्या अनेक बैठका पार पडल्या. त्यातील पहिली बैठक 6 एप्रिल रोजी पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्याव्यात याबाबत सहा कुलगुरुंची एक समिती स्थापन करण्यात आली. डॉ. सुहास पेडणेकर हे त्या समितीचे प्रमुख होते. दरम्यान, 29 एप्रिल रोजी यूजीसीने गाईडलान्स दिल्या. त्यात कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर परीस्थिती पाहून सरकारने निर्णय घ्यावा असे म्हटले. नंतर युजीसीने निर्णय फिरवला असेही, उदय सामंत यांनी या वेळी सांगितले.

मंत्री उदय सामंत यांनी या वेळी राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सींद्वारे झालेल्या बैठकांचे फुटेजही प्रसारमाध्यमांना दाखवले. या फुटेजमध्ये राज्यातील बहुतांश कुलगुरु हे कोविड 19 संकटाच्या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास नकार दिला. तसेच परीक्षा घेण्यासाठी आवश्यक तयारी नसल्याचेही सांगितले. ऑनलाईन शिक्षणपद्धतीबाबत बोलतानाही काही अनेक कुलगुरुंनी आवश्यक साधनांची उपलब्धता नसल्याचा मुद्दा उपस्थीत करत असमर्थता दर्शवली. (हेही वाचा, Coronavirus काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत UGC ने गाईडलाइन्स द्यावी- उदय सामंत)

दरम्यान, काही लोक सरकारवर कुलगुरु अथवा संबंधीत संस्थांची चर्चा न केल्याचा आरोप करत आहेत, असा आरोप करत आहेत परंतू तो चुकीचा आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. उगाच कोणी सरकारव टीक करु नये असेही उदय सामंत या वेळी म्हणाले. दरम्यान, मागील वर्षांच्या गुणांची सरासरी काढून निकाल द्यवा. तसेच, एटीकेटी विद्यार्थ्यांना सरासरी गुणांद्वारे पास करावे अशी विनंती कुलगुरुंनी शासनाला केल्याचेही उदय सामंत या वेळी म्हणाले.