महाराष्ट्रात कोरोना संकट गडद होत असताना राज्यातील नागपूर येथून कौतुकास्पद बातमी समोर आली आहे. भारतीय हवाई दलात (Indian Air Force) महाराष्ट्रातील पहिली महिला लढाऊ वैमानिक (First Woman Fighter Pilot From Maharashtra) म्हणून नागपूरच्या अंतरा मेहता (Antara Mehta) यांची निवड झाली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. या पदावर निवड झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत. शिवाय 'फ्लाईंग ऑफिसर' म्हणून निवड झालेल्या या वर्षीच्या तुकडीतील त्या देशातील एकमेव महिला अधिकारी आहेत. अंतरा मेहता आता लढाईच्या मैदानात जाण्यासाठी तयार आहेत.
अंतरा मेहता यांचे प्राथमिक शिक्षण माऊंट कार्मेल गर्ल्स स्कूलमध्ये आहे. यापुढे अभियांत्रिकीचे शिक्षण रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍंड मॅनेजमेंटमधून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी एसएसबीची तयारी केली. मग त्यांनी हैदराबाद येथील डुंडीगल इथल्या एअर फोर्स अकादमीत प्रवेश मिळवला होता. पिलेटस पीसी-7, दुसऱ्या टप्प्यात त्यांनी किरण एमके -1 विमान उडवले आहे. हे देखील वाचा- MPSC Mains Final Result 2019: राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल जाहीर; mpsc.gov.in वर पाहता येणार निकाल, कट ऑफ, मेरिट लिस्ट
ट्विट-
Flying Officer Antara Mehta, daughter of Ravi & Poonam Mehta becomes the first women Fighter Pilot frm #Nagpur & #Maharashtra at Combined Graduation Parade at Air Force Academy on 20June20. She is the only women officer in her batch selected for Fighter Stream.@SpokespersonMoD pic.twitter.com/G5eF2xTMqI
— PRO Defence Nagpur (@PRODefNgp) June 20, 2020
महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्त्व सिद्ध केलेच आहेत. आता महाराष्ट्राला पहिली महिला लढाऊ वैमानिक अखेर मिळाली आहे. अंतरा यांच्या कामगिरीची संपूर्ण महाराष्ट्रातून कौतूक केले जात आहे. अंतरा मेहता यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही अंतरा यांचे मनापासून कौतूक केले आहे.