
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकी दरम्यान 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) जाहीर करण्यात आली होती. या योजनेच्या जोरावर महायुतीने निवडणूक जिंकली पण आता ही योजना टिकवणं सरकार साठी जिकरीचं होत आहे. विरोधकांकडून या योजनेवरून सरकार वर टीकास्त्र डागलं असताना आता लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याच्या हफ्त्याची प्रतिक्षा आहे. आज मंत्री अदिती तटकरे यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' बद्दल सध्या सुरू असलेल्या चर्चांना उत्तर देताना एप्रिल महिन्यातील हफ्ता कधी मिळणार? याची देखील माहिती दिली आहे.
लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून झाली आहे. आता यामध्ये एप्रिल 2025 चा हफ्ता लाभार्थी महिलांना अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर म्हणजे 30 एप्रिलला मिळणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभाच्या नावाखाली 20 लाख रुपयांचे कर्ज; 65 महिलांची फसवणूक).
500 रुपयांचा संभ्रम दूर
आदिती तटकरे यांनी नमो शेतकरी योजनेतून लाभ घेतात, त्यांना एक हजार रुपये त्यातून मिळतात. शासनाच्या योजनांमधून किमान 1500 रुपये त्यांना मिळावेत असी सोय असल्याने लाडकी बहीण योजनेमधून केवळ 500 रूपये दिले जाणार आहेत असे स्पष्ट केले आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. असं तटकरेंनी पुन्हा स्पष्ट केले आहे.
महायुतीने विधानसभा निवडणूकीच्या जाहीरनाम्यामध्ये 1500 वरून 2100 रूपया हफ्ता लाडक्या बहिणींना दिला जाईल असं जाहीर केले होते आता त्याची प्रतिक्षा लाभार्थी महिलांना आहे. अदिती तटकरे यांच्या माहितीनुसार, राज्यात २ कोटी ४७ लाख महिला या योजनेशी जोडल्या गेल्या आहेत. शेवटचा लाभ देण्यात आला तेव्हा २ कोटी ३३ लाख महिला पात्र होत्या.