LSG vs DC Head to Head: आयपीएलमध्ये कोणाचा वरचष्मा, लखनौ आणि दिल्लीचा हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या
लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात, लखनौ दिल्ली कॅपिटल्सकडून मागील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. या हंगामात, जेव्हा दोन्ही संघ विशाखापट्टणममध्ये भिडले, तेव्हा दिल्ली कॅपिटल्स संघाने 1 विकेटने विजय मिळवला.
Lucknow Super Giants vs Delhi Capitals, 40th Match: आयपीएल 2025 च्या 40व्या सामन्यात, लखनौ सुपर जायंट्स म्हणजेच एलएसजी आणि दिल्ली कॅपिटल्स म्हणजेच डीसी एकमेकांसमोर येतील. लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात, लखनौ दिल्ली कॅपिटल्सकडून मागील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. या हंगामात, जेव्हा दोन्ही संघ विशाखापट्टणममध्ये भिडले, तेव्हा दिल्ली कॅपिटल्स संघाने 1 विकेटने विजय मिळवला. हंगामातील पहिल्याच सामन्यात झालेल्या या पराभवामुळे लखनौ संघाला धक्का बसला. आता लखनौ संघ घरच्या मैदानावर दिल्लीविरुद्ध गुण मिळवू इच्छितो.
पॉइंट्स टेबलबद्दल बोलायचे झाले तर, दिल्ली कॅपिटल्स 7 सामन्यांत 5 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीचे 10 गुण आहेत. तर, लखनौने 8 सामन्यांत 5 विजय नोंदवले आहेत. लखनौचेही 10 गुण आहेत पण नेट रन रेटमुळे ते 5 व्या स्थानावर आहे. (हे देखील वाचा: BCCI Central Contract 2025: एखाद्या खेळाडूला बीसीसीआयच्या केंद्रीय करारात कसे मिळते स्थान? जाणून घ्या अटी आणि शर्ती)
हेड टू हेड रेकाॅर्ड (LSG vs DC Head to Head)
आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 6 सामने झाले आहेत, ज्यामध्ये स्पर्धा बरोबरीची राहिली आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांनी 3-3 सामने जिंकले आहेत. लखनौच्या एकाना स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 2 सामने खेळले गेले आहेत. दिल्लीने एक सामना जिंकला तर लखनौने दुसरा सामना जिंकला. आता दोन्ही संघ तिसरा सामना एकाना येथे खेळतील.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
लखनौ: एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, रवी बिश्नोई, शार्दुल ठाकूर, प्रिन्स यादव / मयंक यादव, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान, आयुष बडोनी
दिल्ली: अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा/दुष्मंथा चमीरा, मुकेश कुमार, डोनोवन फरेरा
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2025 10:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

