
भाईंदर (Bhayandar) मध्ये गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (Gopinath Munde Sports Complex) मध्ये 11 वर्षीय मुलाचा स्विमिंग टॅंक मध्ये बुडून मृत्यू झाला आहे. हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून सांभाळला जातो. रविवार 20 एप्रिलच्या सकाळी एक अवघ्या 11 वर्षाचा मुलगा त्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. मृत मुलाचं नाव ग्रंथ हंसमुख मुथा आहे. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ग्रंथ च्या मृत्यू प्रकरणी सहस चॅरिटेबल ट्रस्टच्या कंत्राटदारासह पाच जणांविरुद्ध आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध BNS च्या कलम 106, 3(5) अंतर्गत FIR दाखल करण्यात आला आहे. अपघात झाला तेव्हा घटनास्थळी कोणताही जीवरक्षक उपस्थित नव्हता, असा आरोप करत पीडितेच्या पालकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. Chennai: ऑटिस्टिक मुलाचा स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू, ट्रेनर आणि मालकावर गुन्हा दाखल .
ग्रंथच्या वडिलांच्या दाव्यानुसार, त्यांचा मुलगा सकाळी 11 वाजता तलावात उतरला आणि 45 मिनिटांनंतर तो तरंगताना आढळला. Midday शी बोलताना दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी ग्रंथ आठवड्यापूर्वीच पाचवी पास झाला होता. त्याला स्विमिंग शिकायचे होते. त्याच्या चार मित्रांसोबत तो स्विमिंगला गेला त्यांच्यासोबत एकाचे पालकही होते. रविवारी 11 वाजता टॅंकमध्ये उतरल्यावर तो 45 मिनिटांत तरंगताना आढळला. 15 दिवसांच्या या शिबिरात सुमारे 35 मुलांनी सहभाग नोंदवला होता. स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्युमुखी पडलेल्या ग्रंथला बाहेर काढण्यात आले आणि एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्याला पोहोचताच मृत घोषित करण्यात आले. सुरुवातीला अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदवण्यात आला.
"घटना कशी घडली हे समजून घेण्यासाठी मी स्विमिंग पूल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे. अशी घटना पुन्हा कधीही घडणार नाही याची मी खात्री करेन," असे ग्रंथचे वडील म्हणाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Mira Bhayandar Municipal Corporation ने क्रीडा संकुलाला त्यांच्या कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने दिले होते, परंतु कंत्राटदाराने उन्हाळी शिबिर आयोजित करण्यासाठी एजन्सीला, एका थर्ड पार्टीला सहभागी करून घेतले. या घटनेनंतर, नवघर पोलिसांनी खाजगी एजन्सीच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.