Gujarat Beat Kolkata IPL 2025: गुजरात टायटन्सने कोलकाताचा 39 धावांनी केला पराभव, गोलंदाज नंतर फलंदाजही ठरले फ्लॉप

या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 39 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 3 गडी गमावून 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआर संघाला फक्त 159 धावा करता आल्या. गुजरातचा हा आठ सामन्यांतील सहावा विजय आहे.

Gujarat Beat Kolkata IPL 2025: गुजरात टायटन्सने कोलकाताचा 39 धावांनी केला पराभव, गोलंदाज नंतर फलंदाजही ठरले फ्लॉप
Photo Credit- X

Kolkata Knight Riders vs Gujarat Titans IPL 2025 39th Match: आयपीएल 2025 (IPL 2025) चा 39 वा सामना आज म्हणजेच 20 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (KKR vs GT) यांच्यात कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 39 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 3 गडी गमावून 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआर संघाला फक्त 159 धावा करता आल्या. गुजरातचा हा आठ सामन्यांतील सहावा विजय आहे. (हे देखील वाचा: LSG vs DC Head to Head: आयपीएलमध्ये कोणाचा वरचष्मा, लखनौ आणि दिल्लीचा हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या)

शुभमन गिलची 90 धावांची शानदार खेळी

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सची शानदार सुरुवात झाली. गुजरातने निर्धारित 20 षटकांत तीन गडी गमावून 198 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिलने 90 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 55 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, साई सुदर्शनने 52 आणि जोस बटलरने 41 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सकडून वैभव अरोरा, आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

गुजरातची शानदार गोलंदाजी

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाची सुरुवात निराशाजनक राहिली. कोलकाता 20 षटकांत आठ विकेट गमावून फक्त 159 धावा करु शकला. कोलकाता नाईट रायडर्सकडून कर्णधार अंजिक्य राहणेने 50 धावांची सर्वाधिक खेळी केली. पण संघाला विजयापर्यच पोहचवू नाही शकला. खेळीदरम्यान, त्याने 36 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याच्याशिवाय कोणत्याही फलंदाजाला जास्त धावा करता नाही आल्या. त्याच वेळी, गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णा आणि रशीद खानने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).