समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharastra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकर यांच्या इडीकडून (Income tax department) होणाऱ्या चौकशीवर ट्विटर माध्यमातून प्रतिक्रिया देणे चांगलेच महागात पडले आहे. अंजली दमानिया  (Anjali damania) यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे यांची खिल्ली उडवून ट्रोलर्सला आमंत्रित केले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून खालच्या पातळीची भाषा वापरल्यानंतर अंजली दमानिया थेट राज ठाकरे यांनी संदेश करुन कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. अंजली यांच्या संदेशाला अद्याप राज ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी ईडीकडून चौकशी करण्यात आली . त्यानुसार राज ठाकरे कुटुंबासह इडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले होते. राज ठाकरे यांच्यासह त्यांची पत्नी मुलगी, मुलगा, सून आणि त्यांची बहीण देखील उपस्थित होती. यावर प्रतिक्रिया देताना अंजली दमानिया म्हणाल्या की, राज ठाकरे चौकशीसाठी जात आहे का? सत्यनारायणाच्या पूजेला? यावर अधिच संतप्त असलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी अंजली यांना शिंगावर घेतले आहे. एवढेच नव्हे तर, या कार्यकर्त्यांनी त्यांना अपशब्द वापरले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या संदर्भात अंजली यांनी राज ठाकरे यांच्याकडे मनसे कार्यकर्त्यांकडे तक्रार केली आहे. परंतु यावर राज ठाकरे यांनी कोणतीही तक्रार दिलेली नाही. हे देखील वाचा-Kohinoor Mill Case: कितीही चौकशी करा, तोंड बंद ठेवणार नाही; राज ठाकरे यांनी ईडी चौकशीनंतर दिली पहिली प्रतिक्रिया

अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांच्या ED चौकशी दरम्यान केलेले ट्वीट-

ट्रोल केल्यानंतर राज ठाकरे यांना केलेला संदेश-

इडीची चौकशीनंतर राज ठाकरे पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी कृष्णकुंजच्या बाहेर प्रचंड गर्दी झाली होती. तसेच राज ठाकरे घरी परतल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.