'Diary of a Home Minister t | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आपल्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या आत्मचरित्रातील (Anil Deshmukh Autobiography) काही पाने आपल्या सोशल मीडिया (Social Media) हँडलवर पोस्ट केली आहे.  ज्यामध्ये भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजन आरोप करण्यात आले आहेत. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. देशमुख यांनी आपल्या आत्मचरित्रातील काहीच पाने एक्स (जुने ट्विटर) वर पोस्ट केली आहेत. त्यामुळे संपूर्ण पुस्तकाबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. हे पुस्तक केव्हा प्रकाशित होणार याबाबत अद्याप माहिती पुढे आली नाही. मात्र, ते विधानसभा निवडणूक 2024 पूर्वीच प्रसिद्ध केले जाईल, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

''बंद दरवाज्यांआडून कपटी राजकीय डाव''

अनिल देशमुख  यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, घटनांचे कथन ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकातील नवव्या प्रकरणात केले आहे. ते तुमच्याशी इथे शेअर करतोय! अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारचं काय होणार होतं, भाजपाला त्यांना कसं अडकवायच होतं? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध कोणता कपटी डाव रचला गेला? बंद दरवाज्यांच्या आडून खेळला गेलेला कपटी राजकीय डाव!, असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (हेही वाचा, Anil Deshmukh Autobiography: अनिल देशमुख यांचे आत्मचरित्र 'Diary of a Home Minister' होणार निवडणुकीपूर्वी प्रकाशित; भाजपकडून टीका)

आत्मचरित्राबद्दल प्रचंड उत्सुकता

नक्की त्यांचा प्लॅन काय होता?

देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आलेल्या व्यक्तीने नेमकी कोणती ऑफर केली, याबाबत भाष्य करणाऱ्या पानांतील एका पानातील मजकूर खालील प्रमाणे:

वापर प्रामुख्याने भाजपच्या राजकीय विरोधकांना छळण्यासाठीच केला जातो. तेव्हा एकूणच ईडीने आपली विश्वासार्हता गमावलेली होती आणि तिचा अधिकाधिक गैरवापर सुरू होता.

मी म्हटलं - ठीक आहे, येऊ दे ईडीच्या अधिकाऱ्यांना !

मग त्याने पुन्हा आपल्या फोनवरून देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला आणि आमचं बोलणं घडवून आणलं.

देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पुन्हा तेच सांगितलं- “ईडीचे काही अधिकारी तुमच्याकडे येतील, इकडचे तिकडचे प्रश्न विचारतील आणि मग प्रकरण मिटल्यातच जमा.”

त्यानंतर त्यांनी म्हटल्याप्रमाणेच झालं. तपासमोहिमेत ईडीनेदेखील उडी घेतली आणि मग माझी खात्रीच झाली की देवेंद्र फडणवीस हेच एकतर या साऱ्या पटकथेचे सूत्रधार आहेत किंवा या पटकथेतील एक प्रमुख पात्र तरी!

ईडीने माझ्या विरोधात एक मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण दाखल केलं. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर ईडीने ही कारवाई केली. ६८

वास्तविक, यापूर्वीही असं बऱ्याचदा घडलं होतं- एखाद्या तपासयंत्रणेने आधी एखाद्याच्या विरोधात केस दाखल करायची. त्यानंतर त्या केसच्या एफआयआरच्या आधारे ईडीने आपली केस दाखल करून त्या प्रकरणात उडी घ्यायची. आणि मग पुढे जाऊन मूळ तपासयंत्रणेने (माझ्या प्रकरणात सीबीआय) त्यातून अंग काढून घ्यायचं. त्यानंतर ईडीला रान मोकळं. म्हणजे आपल्या अधिकारांचा अनिर्बंध वापर करून ईडीने भाजपच्या राजकीय विरोधकांना अटक करायची. २०१४ नंतर केंद्रातील सत्ताकारणाचं हे एक मॉडेलच ठरून गेलं होतं आणि त्याची सारी सूत्रं होती भाजपच्या हातात !

चार-पाच दिवस झाले असतील - नसतील, तो समित कदम पुन्हा भेटायला आला. ही माझी त्याच्याबरोबरची तिसरी भेट होती.

पुन्हा तोच क्रम... स्वत:ची गाडी हँगिंग गार्डनजवळ पार्क करायची आणि मग दुसरी गाडी घेऊन माझ्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर यायचं !

मात्र, या वेळी त्याच्या वागण्यात एक वेगळीच काहीतरी ऐट - मिजास होती. तो म्हणाला- “देवेंद्र फडणवीसांना तुमच्याशी काहीतरी अर्जंट बोलायचं आहे...'

"

असं बोलून त्याने स्वत:च देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला आणि आमचं बोलणं घडवून आणलं. या वेळी देवेंद्र फडणवीस तिकडून म्हणाले- “भाऊ, माझं वरती बोलणं झालंय, सारं काही नीट ठरलं आहे. आम्ही तुम्हाला १०० । डायरी ऑफ ए होम मिनिस्टर.