शिरुर लोकसभेचे तिकिट जाहीर झालेल्या अमोल कोल्हे यांना निवडणुकीत हरवणार, राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याची बॅनरबाजी
शिरुर लोकसभेचे तिकिट जाहीर झालेल्या अमोल कोल्हे यांना निवडणुकीत हरवणार, राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याची बॅनरबाजी (Photo Credits-Twitter)

येत्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर झाल्या. त्यानंतर आता पक्षातील उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. या स्थित आता शिरुर लोकसभेचे तिकिट मिळालेल्या डॉ.अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांना लोकसभा निवडणुकीत हरवणार असल्याची बॅनरबाजी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याकडून करण्यात आली आहे.

शिरुर येथून 2004 साली माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणुक लढवली होती. मात्र शिवसेना पक्षकडून उभे राहीलेले शिवाजीराव पाटील यांचा त्यावेळी विजय झाला होता.तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी असे सांगितले जात होते. तर अजित पवार यांच्या समोर पाटील यांच्या समोर प्रस्तावही मांडला होता. परंतु अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काहीही झाले तरीही शिरुर येथील जागा मिळवाची अशा प्रयत्नात असताना कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे कोल्हे यांना पक्षात आधीपासून असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विरोध सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.(हेही वाचा-Lok Sabha Election 2019: पार्थ पवार, डॉ अमोल कोल्हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, राष्ट्रवादी कॉंग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर)

या बॅनरमध्ये राष्ट्रवादी मधून तुम्ही लढणार असतील तर आम्ही आमची ताकद दाखवणार अशा पद्धतीचे लिहिले गेले आहे. त्यामुळे कोल्हे आता या बॅनरबाजीवरुन काय उत्तर देणार याची आता प्रतिक्षा करावी लागणार आहे.