Lok Sabha Election 2019: पार्थ पवार, डॉ अमोल कोल्हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, राष्ट्रवादी कॉंग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Parth Pawar (Photo Credit; Facebook)

2nd List of NCP Candidates For Loksabha polls 2019: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने (NCP)  लोकसभा निवडणूकीची दुसरी यादी आज जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांच्यानंतर मावळ मधून आज अखेर पार्थ पवार (Parth Pawar)  याचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. यासोबतच नुतकेच राष्ट्रवादी पक्षामध्ये गेलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांना शिरूर मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासोबत राष्ट्रवादी पक्षाने आज एकूण उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. Lok Sabha Election 2019: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर; सुप्रिया सुळे, उदयन राजे भोसले, आनंद परांजपे यांच्या सह 11 उमेदवार जाहीर

ANI  ट्विट 

राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार

  • डॉ. अमोल कोल्हे - शिरूर
  • पार्थ पवार - मावळ
  • बजरंग सोनावणे - बीड
  • समीर भुजबळ - नाशिक
  • धनराज महाले - दिंडोरी

पार्थ पवारच्या रूपाने पवार कुटुंबातील चौथी पिढी राजकारणात उतरणार आहे. पार्थ पवार हे अजित यंचे चिरंजीव आहे. त्यामुळे आता माढा मतदारसंघाचं काय? याबाबत लवकरच खुलासा केला जाईल. 29 वर्षीय पार्थ पवार यांनी UK मध्ये उच्च  शिक्षण घेतले आहे. पार्थ यांनी कायद्याचे शिक्षण घेतलं आहे.  मावळ लोकसभा मतदारसंघ: पार्थ पवार यांच्यासमोर लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विजयासाठी ही आहेत आव्हानं

11,18,23 आणि 29 एप्रिल या दिवशी महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार आहे. तर देशभरातील निवडणुकीचा निकाल 23 मे 2019 दिवशी लागणार आहे.