Lok Sabha Elections 2024: अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवणार; राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणा
Sunetra Pawar (PC - Facebook)

Lok Sabha Elections 2024: आगामी सार्वत्रिक निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मंगळवारी ही घोषणा केली. वृत्तानुसार, तटकरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा असा विश्वास आहे की, पक्षाचा पाया भक्कम असलेल्या मतदारसंघात स्पर्धा करावी. जागावाटपाचा करार अंतिम झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना बारामतीसाठी पक्षाच्या उमेदवार म्हणून नियुक्त केले जाईल.

राष्ट्रवादीच्या या घोषणेने बारामतीच्या जागेसाठी दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुनेत्रा यांच्या वहिनी सुप्रिया सुळे या विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस (SP) च्या विद्यमान खासदार आहेत. पवार कुटुंबातील दोन सदस्य एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविण्याची ही पहिलीच घटना असणार आहे. (हेही वाचा -Lok Sabha Elections 2024: ठरलं तर मग! काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापुरातून उमेदवारी जाहीर)

कोण आहेत सुनेत्रा पवार?

2010 मध्ये स्थापन झालेल्या एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या संस्थापक सुनेत्रा पवार, विद्या प्रतिष्ठान या सुप्रसिद्ध स्वदेशी शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त पदावरही कार्यरत आहेत. 2011 पासून, त्यांनी फ्रान्समधील जागतिक उद्योजकता मंचासाठी थिंक टँक सदस्य म्हणून काम केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, त्यांचे भाऊ पदमसिंह पाटील, ज्येष्ठ राजकारणी आणि माजी मंत्री आहेत. (हेही वाचा - Lok Sabha Elections 2024: काँग्रेसकडून लोकसभा निवडणूकीसाठी 3 जागांवर उमेदवारांची घोषणा, प्रियंका गांधी 'या' मतदारसंघातून लढणार)

याउलट, सुप्रिया सुळे यांनी 2009 पासून सलगपणे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यापूर्वी 2006 ते 2009 पर्यंत राज्यसभा सदस्य म्हणून काम केले आहे. 2009 पासून तीन वेळा लोकप्रतिनिधी राहिलेल्या सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा यांना निवडणूक लढवण्याचा लोकशाही अधिकार असल्याचं म्हटलं होतं. तसेच सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढविल्याच्या अफवांना उत्तर देताना शरद पवार यांनीही लोकशाही प्रक्रियेवर भर देत अशाच भावना व्यक्त केल्या होत्या.