Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

बालविवाह (Child Marriage) करणं गुन्हा असलं तरी असे अनेक प्रकार देशाच्या कानाकोपऱ्यात होत असतात. बालविवाहाची अशीच एक घटना अहमदनगर (Ahmednagar) येथून समोर येत आहे. चक्क आई-वडीलांनी आपल्या 14 वर्षांच्या मुलीचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर मुलगी गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आई-वडीलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नगर तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय मुलीचे तिच्या आई-वडीलांनी लग्न लावून दिले. लग्नानंतर काही महिन्यांतच ती गर्भवती झाली. त्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळेस मुलगी अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. डॉक्टरांनी हा सर्व प्रकार एमआयडीसी पोलिसांना कळवला. त्यानंतर पोलिसांनी मुलीचे आई-वडील, पती आणि सासू-सासरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Nashik: नवरी मिळेना नवऱ्याला..! चाळीशीतल्या इसमाने केले सोळा वर्षांच्या मुलीशी लग्न, बालविवाह कायद्यांतर्गत गुन्हा दाखल)

बालविवाह, स्त्रीभ्रुण हत्या यांसारख्या प्रकारांनी आपला समाज पोखरला आहे. जनजागृती, कायदे करुनही यांसारखे प्रकार अद्याप संपलेले नाही. परंतु, याबाबत सजग होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा घटनांना आळा बसणे आवश्यक आहे. (Thane Rape: ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडिताच्या आईलाही मारहाण; 45 वर्षीय व्यक्तीला अटक)

दरम्यान, मुलगी, महिला यांच्यासंदर्भातील हेच प्रश्न नाहीत. तर अनेक प्रश्न समाजात आहेत. लैगिंक अत्याचार, बलात्कार, अॅसिड हल्ले यांसारख्या घटनांमुळे स्त्री सुरक्षेचा प्रश्न समाजासमोर कायम आहे. याविरुद्ध महिलांनीही पुढे उभे प्रतिकार करणे, वेळीच मदत घेणे, तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.