Thane Rape: ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडिताच्या आईलाही मारहाण; 45 वर्षीय व्यक्तीला अटक
Hoshiarpur Rape accused| Representational Image (Photo Credits: File Image)

देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर (Minor Girl) होणाऱ्या बलात्काराचे (Rape) सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच महाराष्ट्राच्या (Maharashtra) ठाण्यात (Thane) सर्वांना हादरून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडिताच्या आईला मारहाण केल्याप्रकरणी एका 45 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पीडित मुलगी तिच्या घराजवळ खेळत होती. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या आरोपी व्यक्तीने तिला जबरदस्तीने आपल्या घरात घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेची जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडिताच्या आईलाही आरोपीने मारहाण केली. तसेच तिला ठार मारण्याचेही आरोपीने धमकी दिली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हे देखील वाचा- Rape: पतीसमोरच पत्नीवर बलात्कार, धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

एएनआयचे ट्वीट-

ठाण्यात याआधी मे महिन्यात अशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या परिसरात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीवर सलग 6 महिन्यांपासून बलात्कार केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेतील सर्व आरोपी 20 वर्षा खालील आहेत.