Shiv Sena (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात येत्या 21 ऑक्टोबर दिवशी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सारेच पक्ष कामाला लागले आहेत. आज (4 ऑक्टोबर) हा या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र अद्याप काहींना उमेदवारी जाहीर न झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेतील नाराजांनीदेखील काल रात्री मातोश्रीच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. अशोक पाटील हे मुंबईतील विद्यमान आमदार आहेत. मात्र त्यांना अद्याप तिकीट जाहीर करण्यात न आल्याने त्यांच्या समर्थक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 'अशोक पाटील यांना तिकीट जाहीर झाले नाही ही आमच्यासाठी आश्चर्याची बाब आहे. ते कायम आमच्या पाठीशी राहतात. आमची आशा आहे की उद्धव आणि आदित्य ठाकरे आम्हांला न्याय देतील. 'अशी भावना त्यांच्या समर्थकांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान आज संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद होणार आहे. घाटकोपर विधानसभा मतदारसंघात युतीच्या राम कदम यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध; 'उद्धव ठाकरे माफ करा, आमचं मत मनसेला' अशी पोस्टरबाजी

ANI Tweet

शिवसेनेकडून वांद्रे मधून विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच तृप्ती सावंत यांनादेखील तिकीट नाकारल्याने काही शिवसैनिकांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. वांद्रे पूर्व येथील विद्यमान आमदार आहेत. 2015 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत विजयी झाल्या होत्या.