शिवसेना - भाजपाच्या युतीने तिकीट वाटप जाहीर केल्यानंतर काही जण नाराज आहेत तर काही जण नवरात्रीमधील महत्त्वाचे मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी करत आहेत. घाटकोपर पश्चिम मध्ये भाजपा आमदार राम कदम (Ram Kadam) यांना युतीने तिकीट दिल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसैनिकांनी विधानसभा निवडणूकीमध्ये राम कदम यांना मत देणार नसून मनसेला मतदान करणार असल्याचे बॅनर झळकले आहेत. शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या बॅनरमुळे ही पक्षांर्गत खदखद बाहेर आली आहे. या बॅनरवर 'आमचं मत यंदा राज ठाकरे यांच्या मनसेला' असं लिहण्यात आलं आहे. विधानसभा निवडणूक 2019: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले युतीच्या जागावाटपात 124 जागा घेण्यामागचे महत्त्वाचे कारण
2018 साली दहीहंडी उत्सवादरम्यान महिलांविषयी राम कदम यांनी केलेली आक्षेपार्ह विधानं केली आहेत. त्यावरून शिवसैनिक नाराज आहेत. परिणामी भाजपाने राम कदम यांना तिकीट जाहीर केल्यानंतर त्याचा विरोध करण्यात आला आहे. मनसेने घाटकोपर मधून गणेश चुक्कल यांना उमेदवारी दिली आहे.
सोशल मीडीयात व्हायरल होतंय पोस्टर
Shiv Sena Poster Shiv Sena Poster
महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. 21 ऑक्टोबर दिवशी मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल लागणार आहे.