Google Maps (Photo Credit: New York Post)

गुगल मॅपच्या (Google Map) सहाय्याने आपल्याला एखाद्या अनोखळी ठिकाणी पोहचण्याचा मार्ग सापडतो. परंतु काही वेळेस गुगल मॅप गंडल्याने ज्या ठिकाणी जायचे आहे तेथे जाण्यास वेळ ही होतो. याच पार्श्वभुमीवर अहमदनगर (Ahamadnagar) येथे जाणाऱ्या तीन जणांनी आपल्या गंतव्य ठिकाणापर्यंत जाण्यासाठी गुगल मॅपची मदत घेतली. परंतु गुगल मॅपची मदत त्यांच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी या तिघांची कार एका धरणात बुडाली असता त्या मधील एकाचा मृत्यू झाला आहे. पण अन्य दोन जणांनी आपला जीव वाचवला आहे.(Pune-Mumbai Highway Accidents: पुण्यात 2 भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू, 10 जखमी)

कळसुबाई शिखरावर ट्रेकिंगसाठी तीन जण निघाले होते. त्यासाठी त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली. परंतु गुगल मॅपवरुन जो मार्ग दाखवला होता तेथील पुलावर अद्याप 20 फूट पाणी आहे. तर रात्रीच्या वेळचा अंधार आणि रस्त्याचा अंदाज नसल्याने त्या तिघांनी गुगल मॅपच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. परंतु झाले असे की, त्यांची कार पाण्यात बुडाली. या दुर्घटनेत दोन जणांनी आपला जीव कसाबसा वाचवून पाण्याबाहेर आले. परंतु त्यांचा एक मित्र पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला.(Raigad: रायगड येथे लग्न वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट दरीत कोसळला; चौघांचा मृत्यू, अनेकजण जखमी)

दरम्यान, हे तिघेजण ज्या मार्गाने जात होते तेथे पुलावर पाणी साठल्याने बंद करण्यात येतो. परंतु बांधकाम विभागाकडून कोणतेही सूचना फलक तेथे लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या तिघांना पुढे काय होईल याचा अंदाज आला नसल्याने ही घटना घडली आहे.