Aaditya Thackeray | (Photo Credit - Twitter)

Shiv Sena UBT Legislature Party Leader: उद्धाव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना नेते, तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सोमवारी मुंबईतील पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत शिवसेना (यूबीटी) विधिमंडळ पक्षनेतेपदी (UBT Legislature Party Leader) निवड करण्यात आली. आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मिलिंद देवरा यांचा 8801 मतांनी पराभव केला.

भास्कर जाधव यांची विधानसभेत पक्षाचे गटनेतेपदी निवड -

ठाकरे गट शिवसेना ज्येष्ठ नेते अंबादास दानवे यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, माजी मंत्री भास्कर जाधव यांची विधानसभेत पक्षाचे गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे, तर सुनील प्रभू यांची पक्षाचे प्रमुख व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (हेही वाचा - Bandra Terminus Stampede: 'रील'मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम..'; वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीच्या घटनेवर आदित्य ठाकरेंचा संताप)

दरम्यान, 2019 च्या तुलनेत यंदाची विधानसभा निवडणूक आदित्य ठाकरे यांच्यासाठी आव्हानात्मक होती. मात्र जवळपास 8 हजारांच्या मताधिक्याने त्यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा रिंगणात होते, तर मनसेने संदीप देशपांडे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवलं होतं.