Jharkhand Spousal Murder: लग्नाच्या 36 व्या दिवशी पतीची हत्या, नववधूचा प्रताप; विषप्रयोग करुन उधळले गुण

Woman Kills Husband: झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील एका 22 वर्षीय महिलेला लग्नाच्या 36 दिवसांनी तिच्या पतीला विष दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिस तपास सुरू आहे.

Jharkhand Spousal Murder: लग्नाच्या 36 व्या दिवशी पतीची हत्या, नववधूचा प्रताप; विषप्रयोग करुन उधळले गुण
Spousal Murder | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Garhwa Crime News: विवाहाच्या अवघ्या 36 व्या दिवशी एका नववधूने चक्क आपल्या पतीवर विषप्रयोग Newlywed Poison Case) केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या घटनेत पतीचा मृत्यू (Spousal Murder India) झाला आहे. ही घटना झारखंड (Jharkhand Murder Case) राज्यातील गढवा जिल्ह्यातील एका गावात घडली. विवाहीत महिला अवघी 22 वर्षांची आहे. पतीच्या कथीत हत्येस जबाबदार असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिस सोमवारी सायंकाळी अटक केली आहे. स्थानिक न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नवविवाहीत मृत पतीची आई राजमती देवी यांनी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीत मृताची पत्नी आणि तक्रारदाराची सून सुनीता हिनेच तिच्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृतानुसार, मृतक बुधनाथ सिंग हा रंका पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बहोकुंदर गावातील रहिवासी होता. त्याचा विवाह 11 मे 2025 रोजी छत्तीसगडमधील रामचंद्रपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील विशुनपूर गावातील रघुनाथ सिंग यांची मुलगी सुनीता हिच्याशी झाले होता. (हेही वाचा, Sangli Horror: महाराष्ट्रातही सापडली किलर सोनम! लग्नाच्या 20 दिवसानंतर वट पौर्णिमेच्या दिवशीचं कुऱ्हाडी वार करून केली पतीची हत्या)

लग्नानंतर लगेचच सुरू झाले वाद

तक्रारीनुसार, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सुनीता आपल्या माहेरी परत गेली. तिने स्पष्ट सांगितले की तिला हे लग्न मान्य नाही आणि ती बुधनाथसोबत राहणार नाही. दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी विवाह टिकवण्यासाठी प्रयत्न केले. गावकऱ्यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यात 5 जून रोजी गावात पंचायतीचे आयोजन करण्यात आले आणि त्यानंतर सुनीता बुधनाथसोबत सासरी परत आली. (हेही वाचा: Tamil Nadu Shocker: तामिळनाडूच्या रानीपेटमध्ये 80 वर्षीय महिलेवर 19 वर्षीय तरुणाचा लैंगिक अत्याचार; प्रतिकार केल्यानंतर केली हत्या)

घटनेचा भीषण टोक

मध्यस्थांनी केलेल्या प्रयत्नानंतर दोघे सोबत राहू लागले. दरम्यान, हे दोघे 14 जून रोजी छत्तीसगडमधील रामानुजगंज बाजारात गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, सुनीता हिने बाजारात बहाणा करत बुधनाथला कीटकनाशक विकत घेण्यास सांगितले. त्यानंतर 15 जून रोजी रात्री तीने हे कीटकनाशक बुधनाथच्या जेवणात मिसळले, असा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बुधनाथ उठला नाही आणि तो मृत अवस्थेत आढळून आला. त्याचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) करण्यात आले असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

पोलिस तपास सुरू

रंका पोलिस स्टेशनचे प्रभारी म्हणाले, 'आईच्या तक्रारीवरून आम्ही पीडिताची पत्नी ताब्यात घेतली आहे. शवविच्छेदन सुरू असून रिपोर्टनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पुढील तपास सुरू आहे.' या घटनेची तुलना नुकत्याच गाजलेल्या सोनम रघुवंशी हनीमून मर्डर प्रकरणाशी होत आहे. अशा घटना देशात वाढत चाललेल्या वैवाहिक हिंसेच्या घटनांकडे लक्ष वेधत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).