Sangli Horror: महाराष्ट्रातही सापडली किलर सोनम! लग्नाच्या 20 दिवसानंतर वट पौर्णिमेच्या दिवशीचं कुऱ्हाडी वार करून केली पतीची हत्या

सांगली येथील एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री दोघांमध्ये भांडण झाले. रात्री 12.30 वाजता अनिल झोपी गेल्यावर राधिकाने त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

Sangli Horror: महाराष्ट्रातही सापडली किलर सोनम! लग्नाच्या 20 दिवसानंतर वट पौर्णिमेच्या दिवशीचं कुऱ्हाडी वार करून केली पतीची हत्या
Husband murdered with axe प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Edited Image)

Sangli Horror: इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडाने (Raja Raghuvanshi Murder Case) संपूर्ण देश हादरला आहे. अशातचं आता महाराष्ट्रात देखील सोनमप्रमाणेचं एका महिलेने लग्नाच्या केवळ 20 दिवसातचं पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगली जिल्ह्यातील (Sangli District) कुपवाड शहरात एका विवाहित महिलेला तिच्या 50 वर्षीय पतीची हत्या (Murder) केल्याच्या आरोपाखाली अटक (Arrest) करण्यात आली आहे. आरोपी राधिका लोखंडे हिचे लग्न तीन आठवड्यांपूर्वी अनिल लोखंडेशी झाले होते. अनिलने 23 मे रोजी सातारा येथील राधिकाशी लग्न केले.

पतीवर कुऱ्हाडीने केला हल्ला -

सांगली येथील एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री दोघांमध्ये भांडण झाले. रात्री 12.30 वाजता अनिल झोपी गेल्यावर राधिकाने त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा - Goa Rape Case: ईद पार्टीसाठी हॉटेलमध्ये बोलावून 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार; POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल)

आरोपी महिलेला अटक -

दरम्यान, राधिकाला बुधवारी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचे प्राथमिक कारण कौटुंबिक वाद असल्याचे सांगितले जात आहे. हे जोडपे सांगली जिल्ह्यातील कुपवाड तहसीलचे रहिवासी आहेत. लोखंडे यांचे हे दुसरे लग्न होते कारण त्यांच्या पहिल्या पत्नीचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू झाला होता.

राजा रघुवंशी हत्याकांड -

इंदूरमधील राजा रघुवंशी यांची मेघालयातील हनिमून ट्रिप दरम्यान त्यांची पत्नी सोनमच्या सांगण्यावरून हत्या करण्यात आली होती. सोनमने तिच्या कथित प्रियकरासह राजाला मारण्याचा कट रचला होता. पोलिसांनी आतापर्यंत सोनम आणि इतर चार जणांना अटक केली आहे. 11 मे रोजी इंदूरमध्ये लग्न झाल्यानंतर राजा आणि सोनम हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. त्यानंतर सोनमने तिच्या प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2025 02:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).