Goa Rape Case: ईद पार्टीसाठी हॉटेलमध्ये बोलावून 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार; POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

तीन मुलींपैकी 2 मुली सख्या बहिणी असून तिसरी पीडिता त्यांची मैत्रीण आहे. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना अटक केली.

Goa Rape Case: ईद पार्टीसाठी हॉटेलमध्ये बोलावून 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार; POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
Rape| प्रतिकात्मक प्रतिमा, फोटो सौजन्य - संपादित प्रतिमा

Goa Rape Case: गोव्यात 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या तिन्ही मुलींवर त्यांच्या अल्पवयीन मित्रांनी बलात्कार (Rape) केल्याचा आरोप केला आहे. या मुलांनी त्यांच्या मैत्रिणींना हॉटेलमध्ये ईदच्या पार्टीसाठी (Eid Party) आमंत्रित केले होते. तीन मुलींपैकी 2 मुली सख्या बहिणी असून तिसरी पीडिता त्यांची मैत्रीण आहे. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना अटक केली. पीडित मुलींचे वय 15, 13 आणि 11 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, आरोपींचे वय 19 आणि 21 वर्षे आहे.

पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल -

गोवा पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या कलमांखाली आणि बलात्काराच्या कलमांखाली अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हॉटेलमध्ये प्रवेशाचे रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब पुराव्या म्हणून गोळा केले आहेत. हॉटेल मालक हरियाणाचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे, ज्याला पोलिसांनी अटक देखील केली आहे. कारण, त्याने मुलांच्या पालकांच्या संमतीशिवाय आणि चौकशीशिवाय अल्पवयीन मुलींना हॉटेलमध्ये राहू दिले. (हेही वाचा - Minor Girl Raped in Mumbai: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गर्भवती; 17 वर्षीय मुलावर POCSO कायद्याखाली गुन्हा दाखल)

हॉटेलमध्ये बुक केली एक खोली -

प्राप्त माहितीनुसार, अल्पवयीन मुलींना वाढदिवस आणि ईद साजरी करण्याच्या नावाखाली हॉटेलमध्ये बोलावण्यात आले होते. मुख्य आरोपी हा 15 वर्षीय पीडित मुलीचा मित्र आहे. ज्याने कळंगुटमधील एका हॉटेलमध्ये खोली बुक केली होती. त्याने त्याच्या मैत्रिणीला त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावले होते, जिथे अल्पवयीन मैत्रिण तिच्या 13 वर्षीय बहिणीला आणि 11 वर्षीय मैत्रिणीला घेऊन आली. तिन्ही अल्पवयीन मुली हॉटेलमध्ये रात्रभर राहिल्या. (हेही वाचा, Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल)

सोशल मीडियावर झाली होती अल्पवयीन मुलाशी ओळख -

दरम्यान, पीडित मुलीने सांगितले की, काही महिन्यांपूर्वी तिची सोशल मीडियावर मुलाशी मैत्री झाली होती. त्यानंतर ते दोघे चांगले मित्र बनले. गेल्या आठवड्यात त्याने तिला ईद साजरी करण्यासाठी बोलावले होते. याच दिवशी त्याचा वाढदिवस देखील होता, म्हणून ती त्याला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती. परंतु तिथे त्याने आणि त्याच्या मित्राने तिन्ही मुलींसोबत लैंगिक संबंध ठेवले. तिने विरोध केला तेव्हा दोन्ही मुलांनी तिला बदनामी आणि गंभीर परिणामांची धमकी दिली.

(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2025 12:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).