Minor Girl Raped in Mumbai: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गर्भवती; 17 वर्षीय मुलावर POCSO कायद्याखाली गुन्हा दाखल
मुलुंड येथील नामांकीत विद्यालयात शिकणाऱ्या एका 17 वर्षीय मुलावर POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिस गर्भवती केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी त्यास अटक करुन डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठवले आहे.
मुंबई (Mumbai) येथील एका अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलुंड येथील नामांकीत विद्यालयात (Well-known College in Mulund) शिकणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेत पीडिता गर्भवती झाली असून, नवघर पोलिसांनी (Navghar police) सदर मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita) आणि पॉक्सो कायद्याच्या (POCSO Act ) विधिध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सततच्या शरीरसंबंधामुळे पीडिता गर्भवती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ठाणे जिल्ह्यातील भीवंडी परिसरात राहते आणि विद्यालयात शिक्षणासाठी मुलुंड येथे येते. आरोपीने तिच्याशी मैत्री आणि प्रेमसंबंध निर्माण केले. ज्यातून त्याने जवळीक वाढवली आणि तीस शरीरसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केले असा आरोप आहे. साधारण 1 एप्रिल ते 31 मे (2025) या दरम्यान आरोपी पीडितेस घेऊन मुलुंड पश्चिम परिसरातील उद्यानाच्या पाठिमागे असलेल्या वाहनतळावर उभ्या असलेल्या (Parked Vehicles) वाहनांमध्ये नेऊन तिच्याशी शीरसंबंध ठेवले. त्याने तिच्याशी सातत्याने ठेवलेल्या शरीरसंबंधाचा परिणाम पीडिता गर्भवती होण्यात झाला. (हेही वाचा, Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल)
वैद्यकीय अहवाला गर्भधारणेची पुष्टी
पीडितेस उद्भवलेल्या शारीरिक त्रासांमुळे तिची ठाण्यातील कळवा येथील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीच्या अहवालात आढळून आले की, पीडिता दोन आठवड्यांची गर्भवती आहे. त्यानंतर पीडितेने नवघर पोलिसांमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीसुद्धा अल्पपयीन आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 64 च्या कलम 12,4 आणि 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी आणलेल्या पॉक्सो कायद्यान्वये देखील गुनाहा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून त्यास डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. (हेही वाचा - Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी)
अल्पवयीन मुलांमध्ये, खास करुन भिन्नलिंही मुलांमध्ये निर्माण होणारे भावबंद हा सामाजिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आणि नाजूक विषय आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा गृहीत धरला तरीसुद्धा असे संबंध जेव्हा शारीरिक संबंधापर्यंत जातात तेव्हा ते अनेकदा कायद्याच्या चौकटीत गुन्हा ठरु शकतात. भारतीय कायद्यानुसार, 18 वर्षांखालील मुलींच्या संमतीनेही झालेला लैंगिक संबंध हा गुन्हा मानला जातो आणि त्याला POCSO (Protection of Children from Sexual Offences) कायद्यांतर्गत बलात्कार समजले जाते. त्यामुळे, अल्पवयीन मुलामुलींमध्ये निर्माण होणाऱ्या भावनिक नात्यांमुळे होणाऱ्या शारीरिक संबंधांना कायद्याच्या दृष्टीने मान्यता नाही. 18 वर्षांखालील मुलगा वा मुलगी यांच्यासोबत झालेला कोणताही लैंगिक संबंध, संमतीने झाला असला तरी तो कायद्यानुसार गुन्हा ठरतो. मुलगी आणि मुलगा दोघेही अल्पवयीन असले तरी कायद्याने त्याला लैंगिक शोषण/बलात्कार मानले जाते. IPC Section 375 – बलात्काराची व्याख्या जर मुलगी 18 वर्षांच्या खाली असेल, आणि गर्भधारणा झाली असेल, तर तिच्या संमतीने संबंध जरी झाले तरी कायद्यानुसार तो बलात्कार (Statutory Rape) ठरतो.
(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2025 08:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

