
मुंबई मध्ये 14 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, ही घटना 14 मे ची आहे. उबर कॅबाने घरी परतत असताना तिच्यासोबत हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. ही घटना 14 मे च्या संध्याकाळी 4.30 ची आहे. कॅब चालकाने या मुलीला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर सोडले. कॅब चालकाला अटक करण्यात आली असून त्याचे नाव Shreyansh Pandey,आहे. पीडीत अल्पवयीन शाळकरी मुलीच्या कुटुंबाने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताच दादर पोलिस स्टेशन कडून चालकाचा शोध घेण्यात आला त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली आहे.
पीडीत अल्पवयीन मुलगी प्रभादेवी येथील तिच्या शाळेत गेली होती आणि संध्याकाळी घरी परतण्यासाठी तिने अॅप बेस्ड कॅब बुक केली होती. ती गाडीत बसल्यानंतर, आरोपी चालकाने तिला तिच्या पवईतील घरी नेण्याऐवजी पूर्व द्रुतगती महामार्गाच्या बाजूला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिचा विनयभंग केला. घरी पोहोचल्यानंतर, त्या मुलीने तिच्या वडिलांना सर्व काही सांगितले आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
POCSO आणि भारतीय कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्याच्या आधारे आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील एका शाळेबाहेर बस चालकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या काही पालकांनी निदर्शने केल्यानंतर काही आठवड्यांनंतर ही घटना घडली आहे. निदर्शक पालकांनी प्रशासनाकडून जबाबदारीची मागणी केली होती आणि मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली होती.