Tamil Nadu Shocker: तामिळनाडूच्या रानीपेटमध्ये 80 वर्षीय महिलेवर 19 वर्षीय तरुणाचा लैंगिक अत्याचार; प्रतिकार केल्यानंतर केली हत्या

महिला जेव्हा घरात एकटी होती, तेव्हा आरोपीने तिच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी महिलेचा तोल गेल्याने आरोपीने तिला ओढून नेले, ज्यामुळे वृद्ध महिलेच्या शरीरावर विविध ठिकाणी गंभीर जखमा झाल्या.

Tamil Nadu Shocker: तामिळनाडूच्या रानीपेटमध्ये 80 वर्षीय महिलेवर 19 वर्षीय तरुणाचा लैंगिक अत्याचार; प्रतिकार केल्यानंतर केली हत्या
Rape | File Image

उत्तर तामिळनाडूमधील (North Tamil Nadu) रानीपेट जिल्ह्यातील काठियावाडी गावात एका धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका 19 वर्षीय तरुणाने 80 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर तरुणाने तिला ओढत नेले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या या गुन्ह्यासाठी आरोपीला अटक करण्यात आली आहे. बुधवारी आरोपी महिलेला ओढत नेत असल्याचे धक्कादायक सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्ये समोर आली, लोक सुन्न झाले. यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

राज्यात एक अति ज्येष्ठ नागरिक देखील सुरक्षित नाही हे पाहता, विरोधी पक्षनेते आणि एआयएडीएमकेचे सरचिटणीस एडाप्पाडी के पलानीस्वामी म्हणाले की, हा गुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या खराब स्थितीचे प्रतिबिंब आहे. प्रकरणाबाबत आर्कोट टाउन पोलिसांनी सांगितले की, आरोपीने त्याची शाळा सोडली होती व तो इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. आरोपीने जेव्हा महिलेवर लैंगिक अत्याचार केले तेव्हा तो दारूच्या नशेत होता. पीडित महिला शेतात राहत होती जिथे तिच्या कुटुंबाची वीटभट्टी होती. (हेही वाचा: BJP MLA Gang Rape Allegation: चेहऱ्यावर मूत्रविसर्जन, विषाणूचे इंजेक्शनही टोचले; कर्नाटकातील भाजप आमदारावर सामूहिक बलात्काराचा आरोप)

महिला जेव्हा घरात एकटी होती, तेव्हा आरोपीने तिच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी महिलेचा तोल गेल्याने आरोपीने तिला ओढून नेले, ज्यामुळे वृद्ध महिलेच्या शरीरावर विविध ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. ही दुखापत प्राणघातक ठरली, ज्यानंतर महिलेचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला पण सीसीटीव्ही फुटेजमुळे तो पकडला गेला.

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2025 11:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).