Polytechnic Curses: पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ; शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश, जाणून घ्या नवी तारीख व कुठे कराल अर्ज
विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित ठेवू नये म्हणून, अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमधील पदविका (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजपर्यंत 1 लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा उशीर लक्षात घेता, विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित ठेवू नये म्हणून, अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
\या निर्णयानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत, आता 26 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील आणि अर्ज सादरीकरणासाठी आवश्यक माहिती https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे. (हेही वाचा: International Education City Navi Mumbai: नवी मुंबई येथे स्थापन होणार भारतातील पहिली ‘इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’; 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना मिळणार LOI)
Polytechnic Curses:
प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमधील पदविका (पॉलीटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत,आता २६ जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील आवश्यक माहिती https://t.co/crX2yOk0Px या संकेतस्थळावर उपलब्ध आहे -उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील pic.twitter.com/YNCp5hvN6w
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 16, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

