
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट करणे अभिनेत्री केतकी चितळे हिला महागात पडले आहे. न्यायालयाने केतकी चितळे (Ketki Chitale) हिस 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकी चितळे हिच्यावर महाराष्ट्रातही विविध ठिकाणी गुन्हे नोंद झाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुढे काय वळण घेते व केतकी चितळे हिच्यावर काय कारवाई होते याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, केतकी चितळे हिने न्यायालयात सुरुवातीला वकील न घेता आपली बाजू स्वत:च मांडली. तसेच, आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय? असा सवालही विचारला.
केतीक चितळे हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ज्या प्रकारची पोस्ट शेअर केली आहे ती, अत्यंत आक्षेपार्ह आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या हितचिंतकांचे म्हणने आहे . राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही निखील भामरे या व्यक्तीची पोस्ट रिट्वीट करुन ते राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्र पोलिसांना टॅग करुन त्यांच्यावर कारावाई करावी असे म्हटले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी या प्रकरणी कळवा पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि गुन्हाही नोंद झाला. दरम्यान, पोलिसांनी तिला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. (हेही वाचा, Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे हिच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल, शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियातील आक्षेपार्ह पोस्ट भोवली)
केतकी चितळे हिने कथीत नितीन भावे या वकिलाची पोस्ट रिपोस्ट करत फेसबुकवर शेअर केली होती. ती पोस्ट खालील प्रमाणे
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
-Advocate Nitin Bhave
केतकी चितळे हिची फेसबुक पोस्ट आतापर्यंत चार हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक केली आहे. तर, जवळपास 367 पेक्षा अधिक युजर्सनी शेअर केली आहे. पोस्टखाली चार हजारांहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. यातील अनेक प्रतिक्रिया या केतकी चितळे हिला विरोध करणाऱ्या आहेत. काहींनी तिला पाठिंबाही दिला आहे. मात्र, तिच्यावर टीका करणाऱ्या पोस्टची संख्या अधिक आहे.