Kiran Mane | (Photo Credits: Facebook)

अभिनेता किरण माने (Kiran Mane) हे अलिकडील काळात सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून चर्चेत असलेले प्रमुख नाव. आताही किरण माने हे आपल्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. निमित्त ठरले अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मराठी भाषा गौरव दिनानमित्त केलेली फेसबुक पोस्ट आणि अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज (Aryan Khan Drugs Case) न सापडल्याच्या बातम्या. या दोन्ही घटनांवरुन किरण माने यांनी दोन वेगवेगळ्या पोस्ट लिहून आपली सडेतोड भूमिका मांडली आहे. किरण माने यांना मुलगी झाली हो (Mulgi Zali Ho) मालिकेतून वगळण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता.

किरण माने पोस्ट

अभिनेता किरण माने यांनी एनसीबीवर टीकास्त्र सोडत आर्यन खान याला पाठिंबा दर्शवला आहे. ''आपल्या पोस्टमध्ये किरन माने यांनी म्हटले आहे की, आपल्या शारख्याचा 'पठान' पिच्चर लागंल तवा लागंल.. आज मात्र त्यानं व्यवस्थित पठान लावला. संविधानिक मार्गानं ! एन.सी.बी नं सखोल चौकशी करून आर्यन खानला निर्दोष जाहीर केलेलं हाय. आर्यनकडं कुठलाच अंमली पदार्थ सापडला नाय आनि त्याचा कुठल्याबी आंतरराष्ट्रीय ड्रग गँगशी संबंध असल्याचा पुरावाबी सापडला नाय. ...कटकारस्थान्यांनी गळ्यात पट्टा बांधून पाळलेले सरकारी अधिकारी किती भिकारचोटपना करत्यात आनि त्यांची विषारी पिलावळ अशा भुरट्या अधिकार्‍यांना 'सिंघम', 'सिंघम' करत कसं डोक्यावर नाचवत्यात याचं ढळढळीत उदाहरन हाय हे ! 'बदनामी' हे या पाताळयंत्री बांडगुळांचं मुख्य जाळं हाय भावांनो... समजून घ्या. हज्जारो वर्षांपास्नं विरोधकांना या जाळ्यातच अडकवत आलेत हे. 'आमचा विरोध कराल तर बदनाम करू.' असा संदेश द्यायचा असतो यांना. त्या बदनामीच्या भितीच्या चिंध्या करून निडरपने पुढं जानारा वाघ एखादाच असतो.. मग त्यो त्यांच्या बापाच्याबी सापळ्यात सापडत नाय ! शाहरूख, लब्यू भावा'' - किरण माने. (हेही वाचा: साॅरी उद्धवजी.. मी किरण माने, मला तुमची माफी मागायचीय!, अभिनेत्याने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर माफी मागितली.)

सोनाली कुलकर्णी यांनी काय म्हटले?

मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना सोनाली कुलकर्णी यांनी म्हटले की, न आणि ण.. श आणि ष…ळ आणि ड, चांदणी मधील च आणि चंद्रामधील च, जहाजमधील ज आणि जीवनामधील ज यांच्या उच्चारातील फरक कळणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! बाकीच्यांना मराठी भाशा दिणाच्या मणापासून षुभेच्छा!!!

Actor Kiran Mane

किरण माने यांची प्रतिक्रिया

सोनाली कुलकर्णी यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना किरण माने यांनी म्हटले की, ''उच्चार चुकवणार यांनी ‘डॅन्स’ची एक लाखाची सुपारी दिली की पारावर आणि ट्रालिवरबी नाचायचं… आणि इकडं येऊन त्यांची टर उडवायची हे बरे न्हवं. अस्सल सातारीत बोलनार या कायमनला न म्हन्नार या आमच्या लाडक्या राज्यांच्या वाढदिवसाला परवा परवाच साताऱ्यात नाचून गेल्यात म्याडम…या नाट्यांना प्रमाणभाषेत बोलनारं कुत्रंबी ईचारत नाय. सगळं यश मिळवलंय ते ग्रामीन भूमिका करूनच. लिश्ट काढा हिट पिच्चरची''.