Aaditya Thackeray यांचा Young Global Leaders यादीत समावेश करणारी World Economic Forum काय काम करते?
Aaditya Thackeray | (Photo Credit - Twitter)

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या रुपात महाराष्ट्राच्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने (World Economic Forum) आदित्य ठाकरे यांचा 2023 मधील जागतिक युवा नेत्यांच्या (Young Global Leaders) यादीत समावेश केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या सह या यादीत सात भारतीयांचा समावेश आहे. यात भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई, टीव्हीएस मोटरचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, बायोझिनचे सीईओ बी. जोसेफ, जिओ हॅप्टिक टेक्नोलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकृत वैश, आणि पॉलिसी ४.० रिसर्च फाऊंडेशनच्या सीईओ तन्वी रत्ना यांचा समावेश आहे.

जागतिक आर्थिक परिषद ही प्रत्येक वर्षी वय वर्षे 40 पेक्षा कमी असलेल्या युवा नेत्यांची यादी जाहीर करते. यंदाच्या यादीत सात भारतीयांचा समावेश झाला आहे. ही यादी जाहीर करताना WEF ने म्हटले आहे की, हे सर्व तरुण संवाद करण्याासाठी सक्षम आहेत. सक्षम कृत्रिम बुद्धीमत्ता असो की आर्थि समावेशाचा मुद्दा. हे सर्व युवक विविध कार्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. यंदाच्या वर्षात जगभरातून समारे 100 युवा नेत्यांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. हे युवा नेते भविष्यातील विविध विचारसरणी आणि संशोधनात्मक गोष्टींमध्ये सहभागी आहेत. (हेही वाचा, Aaditya Thackeray, BJP Yuva Morcha चे Madhukeshwar Desai यांचा World Economic Forum च्या Young Global Leaders list मध्ये समावेश)

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय काम करते?

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ही स्वित्झर्लंडमधील एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जी जागतिक, प्रादेशिक आणि उद्योग अजेंडा तयार करण्यासाठी व्यवसाय, राजकीय, शैक्षणिक आणि समाजातील इतर नेत्यांना गुंतवून जगाची स्थिती सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवते. त्याची स्थापना 1971 मध्ये क्लॉस श्वाब यांनी एक ना नफा ना तोटा फाउंडेशन म्हणून केली होती.

ट्विट

आर्थिक वाढ, पर्यावरणीय स्थिरता आणि सामाजिक प्रगती यासारख्या जागतिक समस्यांवर चर्चा आणि वादविवाद करण्यासाठी WEF स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वार्षिक बैठक आयोजित करते. या मंचाच्या माध्यमातून डब्ल्यूएफ जगभरातील नेत्यांना एकत्र आणते. वार्षिक बैठकीला राज्य प्रमुख, व्यावसायिक अधिकारी, शैक्षणिक आणि इतर प्रभावशाली व्यक्ती उपस्थित असतात.

वार्षिक बैठकीव्यतिरिक्त, WEF विविध जागतिक समस्यांवर संशोधन करते. त्यासंबंधी अहवाल प्रकाशित करते, ज्यात नोकरीचे भविष्य, जागतिक जोखीम आणि जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक यांचा समावेश होतो. शाश्वत आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने उपक्रमांवर सहयोग करण्यासाठी संस्था व्यवसाय आणि सरकारांना एक व्यासपीठ देखील प्रदान करते.