Aaditya Thackeray | Insta

युवासेना प्रमुख आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), भाजप युवा मोर्चाचे मधुकेश्वर देसाई (Madhukeshwar Desai) यांच्यासह 6 भारतीयांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) ने 2023 च्या यंग ग्लोबल लीडर्स (Young Global Leaders list) च्या यादीमध्ये समाविष्ट केल्याची घोषणा केली आहे. अन्य 4 जणांमध्ये TVS मोटरचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, Jio Haptik Technologies CEO आकृत वैश, BioZEEN CEO Vibin B Joseph आणि Policy 4.0 Research Foundation CEO तन्वी रत्ना यांचा समावेश आहे.

यंदाच्या वर्षासाठी 40 वर्षांखालील जगातील सर्वात प्रॉमिसिंग यंग ग्लोबल लीडर्सची यादी जाहीर करताना, WEF ने म्हटले आहे की हे लोक conversational AI आणि आर्थिक समावेशापासून ते आरोग्य समानता आणि क्लायमेट चेंज पर्यंतच्या कामांमध्ये योगदान दिलेल्या व्यक्ती आहेत. यासोबतच आता त्यांनी नोबेल पुरस्कार विजेत्यांची, राष्ट्रप्रमुखांची, ग्रॅमी अवॉर्ड्स विजेते ते 500 टॉप कंपनीच्या सीईओ सोबतच्या मान्यवरांसोबतच्या यादीमध्ये आपलं स्थान बनवलं आहे.

पहा ट्वीट

"या वर्षीच्या यादीमध्ये जवळपास 100 आश्वासक राजकीय नेते, नाविन्यपूर्ण उद्योजक, क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणारे आणि दूरदर्शी कार्यकर्ते यांचा समावेश आहे. जे त्यांच्या क्षेत्रात, देशांमध्ये आणि जगामध्ये सकारात्मक आणि दीर्घकाळ टिकणार्‍या बदलांना गती देत ​​आहेत," असे WEF ने म्हटलं आहे. दरम्यान WEF ही जिव्हिवा स्थित आंतरराष्ट्रीय दर्जाची public-private cooperation आहे.