Anil Navgane Attack: रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर दगडफेक, विकास गोगावले यांच्यासहित 25 जणांवर गुन्हा दाखल
Anil Navgane Attack Raigad PC TWITTER

Anil Navgane Attack:  दोन दिवसांपूर्वीच माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या घरावर अज्ञात लोकांनी दगडफेक केली ही घटना ताजी असताना, मुंबई गोवा महामार्गावरील टेमपाले ते वीर या गावादरम्यान अनिल नवगणे यांच्यावर कारवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला २ मेच्या रात्रीच्या सुमारास करण्यात आले आहे. या हल्ल्यात अनिक नवगणे यांच्या कार चालक जखमी झाला आहे. अनिल नवगणे हे शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. (हेही वाचा- नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध; नवी मुंबई, भाईंदर मध्ये पदाधिकार्‍यांनी दिले राजीनामे)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सुषमा अंधारे यांच्या सोबत अनिल नवगणे यांनी सभेसाठी हजेरी लावली होती. सभा महाड येथे भरवण्यात आली होती. सभेसाठी बड्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. सोबत अनिल त्यांच्या इतर कार्यकत्यांसोबत होते. सभा संपल्यानंतर अनिल कार्यकर्त्यांसोबत इंदापूर येथून कारने घरी परतत होते. कार मुंबई गोवा महामार्गावर येताच ही घटना घडली.

काही अज्ञातांनी कारवर बेदमपणे दगडहल्ला केला. एवढं नव्हे तर अज्ञातांनी लाठ्या काठ्या घेऊव कारवर हल्ला चझवला. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर अज्ञात घटनास्थळावरून फरार झाले. यात चालकाने वेळीच कार पुढे पळवली होती त्यामुळे दोघांचे जीव वाचले. या हल्ल्यात कार चालकाला दुखापत झाली आहे.

अनिल नवगणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोप केला आहे की, हा हल्ला आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी केला आहे. दगडफेकच्या हल्ल्यामुळे राजकारणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी विकास गोगावले यांच्यासह २५- ३० जणांवर गुन्हा दाखल करून घेतला आहे.  पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहे. महाडच्या सभेत अनिल यांनी विकास गोगावले यांच्यावर टीका केली होती. याचा सूड घेण्याकरीता हा हल्ला करण्यात आला असं माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.