गोवर-रुबेला लस टोचल्यानंतर पुण्यात 8 वर्षीय मुलीची तब्येत बिघडली, ससून हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये उपचार सुरु
MR Vaccine (Image used for representational purpose only) (Photo Credits: ANI)

हडपसर परिसरात राहणाऱ्या आठ वर्षीय मुलीला शाळेत गोवर -रुबेला लस (Measles-Rubella Vaccination) दिल्यानंतर त्रास जाणवू लागल्याने पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) ,अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. श्वेता संतोष कांबळे या मुलीच्या पालकांनी शाळेत लस दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी  Paralytic Symptoms लकवा /पक्षाघाताची लक्षणं  जाणवल्याची मुलीने तक्रार केल्याचा दावा केला आहे. लसीकरणानंतर दोन दिवस श्वेताला ताप आला त्यानंतर अचानक तिच्या हाता -पायामधील ताकद कमी झाल्याचे श्वेताच्या पालकांनी सांगितले आहे.

Business Standard च्या वृत्तानुसार, श्वेताला झालेल्या त्रासाशी Measles-Rubella Vaccination चा काहीही संबंध नाही. श्वेताला Guillain-Barre syndrome या आजारामुळे त्रास होत असल्याचे ससून हॉस्पिटलसच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. हा आजार Nervous System शी संबंधित आहे. या आजारात रुग्णाचे स्नायू कमजोर होतात. सध्या अतिदक्षता विभागात असली तरीही श्वेताची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. गोवर - रुबेला लसीकरण केल्याने नपुंसकत्व येईल या भीतीने 41 शाळांचा सोलापुरात लसीकरणाला नकार

श्वेता हडपसर येथील महापालिकेच्या शाळेत दुसरी इयत्तेमध्ये शिकते. 27 नोव्हेंबर पासून राज्यभर सरकारने गोवर -रुबेला लसीकरण मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत शनिवारी श्वेताला शाळेत लस टोचण्यात आली.सुरुवातीचे दोन दिवस तिला ताप आला त्यानंतर अचानक हाता -पायाची हालचाल थाबंल्याने कांबळे कुटुंबीय घाबरले. सुरुवातीला हडपसरच्या स्थानिक रुग्णालयात श्वेताला दाखल करण्यात आले. मात्र नंतर पुण्याच्या ससून हॉस्पिटल्समध्ये तिला दाखल करण्यात आले.

ससून हॉस्पिटल्स आणि पुणे महापालिका आरोग्य विभाग आयुक्त या दोघांनीही गोवर रुबेला लस आणि या आजाराचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. राज्यभरात अनेक मुलांना या लसीकरणानंतर त्रास होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र सरकारकडून लास सुरक्षित असल्याचं सांगण्यात आले आहे. समाजातील Measles-Rubella Vaccination बाबत वाढत्या अफवा रोखण्यासाठी खास जाहिररातीदेखील टेलिव्हिजनवर सुरु आहेत.