Pregnant Women प्रतिकात्मक प्रतिमा (PC - ANI)

Suman Scheme Centres: राज्य आरोग्य विभाग 471 सुविधांमध्ये गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरच्या काळजीसाठी सुरक्षित मातृत्व आश्वासन (Surakshit Matritva Aashwasan, SUMAN) योजना केंद्रांची योजना करत आहे. तात्काळ वैद्यकीय सुविधांशिवाय, ही केंद्रे प्रसूतीनंतर सहा महिन्यांपर्यंत सर्वांगीण गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरच्या कल्याणावरही लक्ष केंद्रित करतील. केंद्राने ऑक्टोबर 2019 मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेत गर्भवती महिला आणि नवजात बालकांसाठी मोफत आरोग्य सेवा देण्यात येते. ज्यामध्ये पोषक आहार आणि लसीकरण यांचा समावेश आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, वेळेवर उपचार केल्यास माता आणि बालमृत्यू कमी होऊ शकतात. 255 केंद्राद्वारे मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले जाईल. तर 157 केंद्रे BEmONC (मूलभूत आपत्कालीन प्रसूती आणि नवजात काळजी) आणि 59 CEmONC (सर्वसमावेशक आपत्कालीन प्रसूती आणि नवजात काळजी) ला समर्पित असतील. 255 मूलभूत केंद्रांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे आणि BEmONC केंद्रांमध्ये उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांचा समावेश असेल. (हेही वाचा - Satara News: फरशी पुसताय? काळजी घ्या! सातारा येथे नऊ महिन्यांच्या बाळाचा फिनेलच्या वासामूळे गुदमरून मृत्यू)

आरोग्य सेवा केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकांनुसार प्रमाणपत्रे घेणे आवश्यक आहे. शिवाय, केंद्रांनी त्यांच्या सेवा आणि यंत्रसामग्री भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार श्रेणीसुधारित करणे आवश्यक आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितलं आहे. (हेही वाचा - Gadchiroli: गडचिरोलीच्या आदिवासी मुलांची पोषण पातळी सुधारण्यासाठी अभिनव उपक्रम)

सार्वजनिक आरोग्य विभागातील माता आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ अनिरुद्ध देशपांडे म्हणाले की, ते फक्त माता आणि अर्भक आरोग्य सुधारण्यावर भर देत आहेत. या योजनेमुळे देशातील संबंधित मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. योजनेंतर्गत, सार्वजनिक आरोग्य सुविधांना भेट देणाऱ्या लाभार्थ्यांना अनेक मोफत सेवा मिळण्याचा हक्क आहे, असंही त्यांनी सांगितलं.