Coronavirus  Lockdown दरम्यान महाराष्ट्रातील 25,000 कंपन्या सुरु; 6 लाख लोक पुन्हा कामावर रुजू, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
Subhash Desai (Photo Credit: Facebook)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात 23 मार्च पासून लॉक डाऊन (Lockdown) चालू आहे. 17 मे रोजी या लॉक डाऊनचा तिसरा टप्पा संपणार आहे. अशात देशासह प्रत्येक राज्याचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. ही तुट भरून काढण्यासाठी प्रत्येक राज्य आता उपयोजना राबवताना दिसत आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Industries Minister Subhash Desai) यांनी सोमवारी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे विविध ठिकाणी काम करणाऱ्या सुमारे सहा लाख लोकांनी आधी बंदी घालण्यात आली होती, आता हे लोक पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.

उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधताना देसाई म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील तब्बल 25,000 कंपन्यांनी पुन्हा आपले कामकाज सुरू केले आहे व या 25,000 कंपन्यांमध्ये काम करणारे सुमारे 6 लाख लोक पुन्हा कामावर आले आहेत. एकट्या पश्चिम महाराष्ट्रात 9,147 उद्योगांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी एकूण 5,774 कंपन्यांनी आधीच कामकाज सुरू केले आहे.’

पुढे ते म्हणाले, ‘मुंबई, ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे पुन्हा उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. या ठिकाणी कोविड-19 ची प्रकरणे जास्त आहेत व त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यामुळे असे प्रदेश अजूनही रेड झोनमध्ये आहेत. या ठिकाणी पुन्हा काम सुरू करण्याचा कोणताही धोका सरकार घेऊ शकत नाही.’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण राज्याला ग्रीन क्षेत्र बनविण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच उद्योगांवरचे ओझे कमी करण्यासाठी वीज दरात कपात आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी सवलती दिल्या जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. (हेही वाचा: महाराष्ट्रात मालेगाव मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद, तर मुंबई मध्ये सुद्धा उष्णतेचा पारा चढला)

Corona Outbreak: २४ तासात १,२७८ नवे रुग्ण; भारतात कोरोना रुग्णांचा आकडा आता ७६,१५२ - Watch Video

राज्यातील लघु उद्योगांना मदत करण्यासाठी केंद्र शासन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासंबधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सदानंद गौडा, पीयुष गोयल यांच्याशी दैनंदिन चर्चा सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणुकीचा विचार असून त्यावर बोलणी चालू असल्याची माहितीही त्यांनी दिली. अशा प्रकारे राज्यावरील आर्थिक संकटाचे सवत दूर करण्यासाठी सरकर वापले टाकत असल्याचे दिसून येत आहे.