कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव झपट्याने वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच कोरोना झाल्याच्या भितीने एका 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याने सर्वत्र एकत्र खळबळ उडाली आहे. ही घटना पुणे (Pune) परिसरातील एका एका खाजगी रुग्णालयात गुरुवारी घडली. मृत व्यक्ती हा खडकी येथील मुळा रोड परिसरातील रहिवासी असलेल्या तरुणांना गेल्या काही दिवसांपासून श्वास घेताना त्रास जाणवत होता. यामुळे त्याला पुणे शहरातील बोपोडी येथील एका खाजगी रुग्णालयात आणले होते. मात्र, आपल्याला कोरोना झाल्याच्या भितीने त्याने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. यामुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
खडकी येथील मुळा रोड परिसरातील रहिवासी असलेल्या एका तरुणाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्याला उपचारासाठी बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात आणले होते. गुरुवारी दुपारी त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्यानंतर तो तणावाखाली होता. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा तरुण बाथरूमला जायचे आहे, असे सांगून बाहेर पडला. त्यानंतर त्याने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे. अद्याप संबंधित मृत व्यक्तीचा अहवाल पाप्त झाला नाही, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. हे देखील वाचा- मुंबई: अॅन्टॉप हिल येथील गरीब नवाज परिसरात स्थानिकांनी मास्क न घालण्यावरुन वाद झाल्यानंतर पोलिसांवर धारदार शस्राने हल्ला, 3 कर्मचारी जखमी
कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरातील नागरिकांच्या मनात मोठी भिती पसरली आहे. देशात कोरोना विषाणूच्या भितीने अनेकांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबईनंतर पुणे शहरात सापडले आहेत. पुण्यात आतापर्यंत 3 हजार 314 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 377 जण कोरोनामुक्त झाले आहेत.