Mumbai Accident: टॅक्सी आणि टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू, 3 जखमी; लालबाग फ्लायओव्हरवर येथील घटना
Accident (PC - File Image)

Mumbai Accident: रविवारी पहाटे लालबाग -परळ उड्डाणपुलावर अपघात झाला. त्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू  झाल्याची घटना समोर आली आहे. तर एक महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. लालबाग पुलावर मिक्सर टेम्पो आणि टॅक्सी यांच्या धडकेत भीषण अपघात अपघाता झाला. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टॅक्सीच्या गेटमध्ये एक महिला अटकलेली होती. टेम्पोच्या मडगार्डमध्ये एक व्यक्ती अडकला होता. या सर्वांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. दुर्योधन गायकवाड, क्लिनर, राजेश जैस्वार अशी या अपघातात जीव गमावलेल्यांची नावे आहेत. याशिवाय कोकिळा वाघरी आणि जयराम यादव नावाची महिला गंभीर जखमी झाली आहे.

सिमेंट मिक्सर कॅबला टॅक्सीची धडक दिल्यानंतर मिक्सर कॅबला स्क्रॅच आल्यावर दोघांमध्ये भांडण सुरु होते. दरम्यान, मिक्सर कॅबच्या चालकाने सुपरवायझरला बोलावले. त्याने टॅक्सी चालकाला नुकसान भरापाई भरण्यास सांगितले. टॅक्सी चालक तेथून निघणार असताना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने टॅक्सीला धडक दिली. टॅक्सीत बसलेली एक महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पोचा चालक लल्लूलाल लक्ष्मण साकेत (४०) याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. या अपघातात साकेतही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.