Jalgaon Accident: जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथील कन्नड घाटात मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अक्कलकोट येथून दर्शन घेऊन परतीच्या प्रवास करत असताना कार दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहे. या घाटात पाऊसासह धुक्यांमुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृतांमध्ये दो महिला आणि एक पुरुषांचा समावेश आहे. सोबत ८ वर्षाच्या मुलीचा देखील अपघाती मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील काही भाविक टवेरा कारने अक्कलकोट दर्शनासाठी गेले होते. यावेळी दर्शन घेऊन परतीचा प्रवास मालेगाव येथून निघाला, चाळीसगाव येथील कन्नड घाटात मोठा प्रमाणात धुके आणि पाऊस देखील होता आणि काळोखात रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची कार वरिल नियत्रंण सुटलं आणि कार कन्नड येथील घाटात कोसळली. कार कोसळल्याने चार प्रवाशांता जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच, अपघातस्थळी दाखल झाले.
जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे.अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. प्रकाश गुलाबराव शिर्के, शिलाबाई प्रकाश शिर्के, वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी, आठ वर्षाची पूर्वा गणेश देशमुख अशी अपघात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.