Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Coronavirus Update In Mumbai: मुंंबईमध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांंचा आकडा वाढत असताना आज मात्र एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. मुंंबई महापालिकेच्या (BMC) वतीने आजची कोरोनाबाधितांंची आकडेवारी दर्शवणारा अहवाल देण्यात आला ज्यानुसार आजच्या दिवसात मुंंबई मध्ये नवीन कोरोना रुग्णांंहुन अधिक रुग्णांंनी कोरोनावर मात केल्याचे समजत आहे. मुंंबईत आज एकुण 1585 नवीन रुग्णांंची भर पडली आहे तर आजच्या दिवसात 1717 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यानुसार शहरातील एकुण कोरोनाबाधितांंचा आकडा हा 1,73,534 इतका झाला आहे तर डिस्चार्ज मिळवलेल्यांंची संख्या 1,34,066 इतकी झाली आहे. सध्या शहरात कोरोनाचे 30,879 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दुसरीकडे आज कोरोनामुळे 49 जणांंचा मृत्यु झाला असुन एकुण बळींंचा आकडा 8227 इतका झाला आहे.

मुंंबई मध्ये कोरोना पसरण्याचा वेग सुद्धा सध्या बराच कमी झाला आहे, सध्या शहरात कोरोना प्रकरणांंच्या दुप्पटीचा कालावधी 54 दिवस इतका आहे. तर शहरातील रिकव्हरी रेट हा 77% इतका आहे. Health Care Tips During Coronavirus: कोरोना काळात च्यवनप्राश, हळद दुधासहित या गोष्टींंचे रोज सेवन करा- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

BMC ट्विट

दरम्यान,  महाराष्ट्रात आजच्या दिवसभरात 20,482 नव्या कोरोनाबाधित रुग्णांंची भर पडल्याचे समजत आहे यानुसार राज्यातील एकुण कोरोनाबाधितांंचा आकडा 10,97,856 वर पोहचला आहे. राज्यात आजवरच्या आकडेवारीनुसार, 30,409 कोरोना बळी गेले आहेत तर 7,75,273 जण कोरोनामुक्त झाले आहेत.