Coronavirus Update: महाराष्ट्रात आज 20,482 कोरोना बाधितांंची वाढ, मृत, अ‍ॅक्टिव्ह आणि डिस्चार्ज मिळालेल्यांंची आकडेवारी इथे पाहा
Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात आजच्या दिवसभरात 20,482 नव्या कोरोनाबाधित रुग्णांंची भर पडल्याचे समजत आहे यानुसार राज्यातील एकुण कोरोनाबाधितांंचा आकडा (Total COVID 19 Cases In Maharashtra)  10,97,856 वर पोहचला आहे. आजच्या दिवसभरात कोरोनामुळे 515 जणांंचा बळी गेला असुन आजवरच्या मृतांंची (COVID 19 Fatality) संख्या 30,409 वर पोहचली आहे. यामध्ये दिलासादायक माहिती अशी की आजच्या दिवसात 19,423 जणांंनी कोरोनावर मात केली असुन आजवरच्या डिस्चार्ज (Coronavirus Recovered Cases) मिळवलेल्या रुग्णांंचा आकडा सुद्धा 7,75,273 इतका झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 2,91,797 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य आरोग्य मंंत्रालयाने माहिती दिली आहे.  Coronavirus: मृत्यू येत नाही तर मग कोरोना व्हायरस संसर्गाला घाबरायचं कशाला? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा बिनधास्त सवाल

महाराष्ट्रात आज मुंंबई आणि पुणे या दोन कोरोनाच्या हॉटस्पॉट असलेल्या शहरात सुद्धा कोरोनाबाधितांंची संख्या सुद्धा वाढली आहे. मुंंबई मध्ये आजच्या एकाच दिवसात कोरोनाचे 1585रुग्ण आढळले आहेत तर पुणे शहरात आज 1691 कोरोनाबाधित आढळले आहेत.

ANI ट्विट

दरम्यान महाराष्ट्रात आजवर कोरोनाच्या 54 लाख 9 हजार 60 चाचण्या झाल्या आहेत आणि यापैकी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांंची टक्केवारी ही केवळ 20.29% आहे, राज्यात कोरोना बळींंचा टक्का हा आता अगदी 2.77 इतका झाला आहे तर दुसरीकडे रिकव्हरी रेट हा 70.62 % इतका आहे.