Coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra) कालच्या दिवसभरात 3,427 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानुसार राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,04,568 वर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात 3830 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे, तर चांगली माहिती अशी की 49346 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 51379 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane), औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात आढळून येत आहेत. तसेच कोकण (Kokan), विदर्भातील (Vidarbha) ग्रामीण भागात सुद्धा हळूहळू कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत याची सविस्तर आकडेवारी जाणून घ्या. Coronavirus Update: भारतात कोरोना बाधितांच्या सर्वात मोठी वाढ! 11,929 नव्या रुग्णांसह देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 3,20,922 वर

मुंबईतील कोरोनाबाधितांचे आकडे पाहायला गेल्यास शहरात कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट हा 24 दिवसांवर गेला आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावीत सुद्धा हा रेट 42 दिवसांवर गेल्याचे समजतेय. तुमचा जिल्हा कंटेनमेंट झोन, रेड, ग्रीन, ऑरेंज झोन यापैकी नक्की कशात मोडतो हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 56831 2113 25947
ठाणे 17306 425 6818
पुणे 11722 469 6567
औरंगाबाद 2560 128 1400
पालघर 2216 48 714
नाशिक 1852 102 1170
रायगड 1781 64 1148
सोलापुर 1738 128 654
जळगाव  1633 120 653
अकोला 990 40 509
नागपुर 982 12 539
सातारा 731 28 419
कोल्हापुर 692 8 521
रत्नागिरी 392 15 256
धुळे 353 26 199
अमरावती 335 21 243
जालना 258 6 156
हिंगोली 236 1 184
अहमदनगर 235 9 166
सांगली 221 7 114
नांंदेड 204 10 137
यवतमाळ 176 3 134
लातुर 163 8 118
सिंंधुदुर्ग 150 0 76
उस्मानाबाद 143 3 100
बुलडाणा 117 3 73
परभणी 81 3 68
बीड 74 2 49
गोंदिया 69 0 68
भंडारा 49 0 38
गडचिरोली 49 1 39
नंदुरबार 48 4 30
चंद्रपुर 46 0 26
वाशिम 41 2 6
वर्धा 14 1 7
अन्य जिल्हे 80 20 0
एकुण 104568 3830 49346

दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार, राज्यात सध्या 55 शासकीय आणि 42 खाजगी अशा एकूण 97 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6  लाख 41 हजार 441 नमुन्यांपैकी 1  लाख 4 हजार 568 नमुने पॉझिटिव्ह (16.3 %) आले आहेत. कालच झालेल्या निर्णयानुसार आता राज्यात कोरोनाचे चाचणी ही जास्तीत जास्त 2200 रुपयात करता येणार आहे त्यासाठी पूर्वी 4400 हजार रुपये द्यावे लागत होते.