पुणे जिल्ह्यांमध्ये वाढता कोरोना पाहता आता नियम अजून कडक करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण आणि शहर भागांत वाढता प्रादुर्भाव पाहता संध्याकाळी 6 ते दिवसा 6 या 12 तासांसाठी संचारबंदी (Night Curfew) असेल तर दिवसा जमावबंदी लागू राहणार आहे. यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. दरम्यान उद्या (3 एप्रिल) पासून हॉटेल, बार, रेस्टॉरंट हे डाईन इन साठी पुढील 7 दिवसांसाठी पूर्ण बंद केली आहे. पण होम डिलेव्हरी सुरू राहणार आहे. यासोबतच पुणे शहरामध्ये पीएमपीएमएल बस (PMPML Bus Service) सेवा बंद राहणार आहे. पण एसटी सेवा (ST Bus Service) ही सुरू राहणार आहे. सोबतच सारी प्रार्थनास्थळं देखील 7 दिवस पूर्णपणे सुरू राहणार आहे. Pune: पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय! कोरोना रुग्णांसाठी खासगी रुग्णालयात 80 टक्के बेड्स राखीव ठेवण्याचे आदेश.
पुणे शहरांत लग्न आणि अंत्यविधी वगळता सारे धार्मिक कार्यक्रम बंद राहणार आहेत. पुण्यात 30 एप्रिल पर्यंत शाळा, कॉलेज बंद राहणार आहेत. पण 10 वी 12वी च्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव (Pune Divisional Commissioner Saurabh Rao) यांनी दिली आहे.
ANI Tweet
A 12-hour night curfew from 6 pm to 6 am in Pune from tomorrow, 3rd April. Situation will be reviewed on next Friday: Pune Divisional Commissioner Saurabh Rao #Maharashtra
— ANI (@ANI) April 2, 2021
पुण्यामध्ये बेड उपलब्ध करण्यासाठी अधिकाधिक सेवा उपलब्ध केली जाणार आहेत.पुण्यात कोल्हापूर, जळगाव येथूनही रूग्ण दाखल होत असल्याने वाढता ताण पाहता अधिकाधिक हॉस्पिटल, कोविड केंद्रं ताब्यात घेण्याचं काम सुरू झाले आहे. पुण्यात चाचण्या मोठ्या प्रमाणात होणार आहेत त्यामुळे रूग्णसंख्या वाढणार आहे. त्यामुळे लसीकरण देखील वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. 45 वर्षांवरील लोकांनी लसीकरणामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे. कार्यालयं नियमित वेळेनुसारच सुरू राहतील असे सांगण्यात आले आहे. पोलिस देखील नियमांचं उल्लंघन करणार्यांना माणूसकीच्या दृष्टीने दंड देतील असे राव यांनी म्हटले आहेत.