पुणे महापौर मुरलीधर मोहोळ (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाने (Coronavirus) डोकेवर काढले आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) मोठा निर्णय घेतला आहेत. पुण्यातील प्रमुख रुग्णालयात बेड्सची कमतरता जाणवू लागल्याने खाजगी रुग्णालयातील 80 टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खासगी दवाखान्यातील 80 टक्के बेड्स कोविड उपचारासाठी उपलब्ध करुन देण्याबाबतचे आदेश आज काढण्यात आले आहेत. येत्या 31 मार्चपासून हे बेड्स कोविड रुग्णांना उपलब्ध होतील, अशा आशयाचे ट्विट मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. हे देखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईत आज कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ! 5888 नव्या रुग्णांसह 12 जणांचा मृत्यू

ट्वीट-

पुण्यात काल (28 मार्च) तब्बल 4 हजार 426 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर, 35 जणांचा मृत्यू झाला होता. सध्या पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या एकूण रुग्णसंख्या 25 लाख 9 हजार 112 वर पोहचली आहे. यापैकी 22 लाख 770 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 5 हजार 219 जणांचा मृत्यू झाला आहे.