Result | Representative image (Photo Credit- Pixabay)

SSC-HSC Supplementary Exam Result 2023: दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंडळाने दहावीची परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट, तर बारावीची परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत घेतली होती. पुरवणी परीक्षा दिलेले विद्यार्थी आपला निकाल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करुन दिलेल्या संकेतस्थळावर पाहू शकता.

विद्यार्थी http://www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. विद्यार्थी या संकेतस्थळावर आपला आसन क्रमांक टाकून परीक्षेचा निकाल पाहू शकतात. या ठिकाणी विद्यार्थी विषयनिहाय गुण पाहू शकता. तसेच गुणपत्राच्या माहितीची प्रत डाऊनलोड करू शकतात. (हेही वाचा -SSC-HSC Supplementary Exam Result 2023: इयत्ता दहावी, बारावी पुरवणी परीक्षा निकाल कोठे पाहाल? घ्या जाणून)

दरम्यान, राज्य मंडळाने 10 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत दहावीची तसेच 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बारावीची परीक्षा घेतली होती. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.