Maharashtra Board 10th SSC Result | (File Image)

Class X,XII Supplementary Exam Result 2023: इयत्ता दहावी, बारावी मुख्य परीक्षेत अपयश आल्यास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणश्रेणीत सुधारणा करावीशी वाटते त्यांच्यासाठी घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचा (Class X,XII Suppelemantary Exam Result) निकाल आज (28 ऑगस्ट) दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन प्रणालीद्वारे जाहीर होत आहे. ही परीक्षा यंदा ऑगस्ट महिन्यातच पार पडली होती. हा निकाल आपण राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करुन दिलेल्या संकेतस्थळावर तत्काळ पाहू शकता. तसेच तो डाऊनलोडही करु शकता. हा निकाल कसा पाहायचा घ्या जाणून.

कुठे पाहाल निकाल

ज्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेत अपयश आले त्यांना या परीक्षेचा निकाल www.mahresult.in या संकेतस्थळावर पाहायला मिळेल. तर ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळवायच्या आहेत त्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना https//verification.mh-ssc.ac.in तर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना https//verification.mh-hsc.ac.in तर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येणार आहे. अर्थात त्यासाठी विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती आवश्यक असणे महत्त्वाचे आहे. जसे की, त्यांचे स्वत:चे पूर्ण नाव, आपला परीक्षा क्रमकां आदी.

उत्तर पत्रिकांचे पुनर्मूल्यांकन कसे कराल?

दरम्यान, जुलै- ऑगस्ट 2023 पुरवणी परीक्षेच्या उत्तर पत्रिकांचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्रथम उत्तर पत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कायर्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्क राहील, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडलाकडे संपर्क साधावा, असे अवाहनही करण्या आले आहे.

ट्विट

इयत्ता दहावी पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत पार पडली. उल्लेखनिय असे की, परीक्षा काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे वेळापत्रका बदल करुन ही परीक्षा आयोजीत करण्यात आली होती. त्यामुळे निकाल काहीसा लांबल्याची चर्चा आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांसह शैक्षणिक वर्तुळात निकालाबाबत जोरदार उत्सुकता आहे. अनेकांना पुन्हा उत्तीर्ण व्हायचे आहे. तर काहींना उत्तीर्ण झाले असले तरी गुणसुधारणा करायची आहे. त्यामुळे एक केव्हा वाजतात यासाठी अनेकांनी डोळे घड्याळांकडे लावले आहेत.