जागतिक पुस्तक दिन हा 23 एप्रिल दिवशी साजरा केला जातो. UNESCO सह जगभरातील साहित्य संबंधित संस्थांकडून दरवर्षी जागतिक पुस्तक दिनाचं सेलिब्रेशन केलं जातं. हा दिवस जगभरातील 10 देशांमध्ये साजरा केला जातो. आजच्या दिवशी जागतिक पुस्तक दिनासोबत World Book and Copyright Day देखील आजचं साजरा केला जातो. 'युनेस्को'कडून या दिवसाचं सेलिब्रेशन करताना William Shakespeare, Miguel Cervantes आणि Inca Garcilaso de la यांना आदरांजली म्हणून आजची तारीख निवडली गेली आहे. युनेस्कोच्या पॅरिसमधील सर्वसामान्य सभेमध्ये 1995 साली जगभरातील लेखल आणि पुस्तकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा करण्यास सुरूवात झाली.
23 एप्रिल 1564 दिवशी महान कवी, लेखक,नाटककार शेक्सपियर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अनेक नाटकांचा, साहित्यकृतींचा भारतासह जगभरातील विविध भाषांमध्ये भाषांतरही झाले. त्यांनी 35 नाटकं आणि 200 पेक्षा अधिक कविता लिहल्या आहे. साहित्य जगतामध्ये शेक्सपियर यांना असलेल्या आदराच्या स्थानामुळे युनेस्कोने 1995 साली तर भारत सरकारने 2001 साली 23 एप्रिल दिवशी जागतिक पुस्तक दिन सेलिब्रेशनची घोषणा केली. World Book Day 2020: Lockdown असो की 'एकांत', प्रत्येक वेळी नवा अनुभव देणारा मित्र 'पुस्तक'.
पुस्तक दिन आणि पुस्तकांबद्दल काही इंटरेस्टींग गोष्टी
- तुम्हांला ठाऊक आहे जगभरात 130 मिलियन पुस्तकं आहेत?
- $30.8 million ला जगातील सर्वात महागडं पुस्तक विकलं गेलं आहे. हे पुस्तक लिओनार्डो द विंची यांचं 'Codex Leicester 'असून बिल गेट्स या प्रसिद्ध उद्योगपतींनी त्याची खरेदी केली. अशी Business Insider ची माहिती आहे.
- अनेकांना नव्या कोर्या पुस्तकांचा वास खूप आवडतो. पण जुन्या पुस्तकांच्या वास घेण्याच्या या गोष्टीला 'bibliosmia'म्हणतात.
- सर्वात लांब छापलं गेलेलं वाक्य हे 823 शब्दांचं आहे.
- The Adventures of Tom Sawyer हे पहिलं असं पुस्तक आहे जे टाईपरायटर वापरून लिहण्यात आले.
- हॅरी पॉटर, पवित्र ग्रंथ बायबल आणि Quotations from Chairman Mao Tse-Tung ही तीन पुस्तकं जगात सर्वात जास्त वाचली गेलेल्या पुस्तकांपैकी आहे.
- जगात आईसलंड मधील लोकं सर्वाधिक पुस्तकं वाचतात.
जागतिक पुस्तक दिन हा जगभरातील अनेक लोकांसाठी महत्त्वाचं व्यासपीठ बनलं आहे. यामुळे प्रामुख्याने साहित्य क्षेत्रातील निगडीत व्यक्ती, उद्योजक, लेखक, प्रकाशक, शिक्षक, वाचनालयं, संस्था, एनजीओ आणि मास मीडीयाला शिक्षणाला चालना देऊन सार्यांनाच आनंदासोबतच ज्ञानाचीदेखील देवाणघेवाण करता येते.