Kisan Diwas 2018 : राष्ट्रीय शेतकरी दिन नेमका का साजरा केला जातो? कोणी केली सुरुवात?
Farmers Day / Kisan Diwas ( (Photo Credits: @nikhil_x3/ @me_viveknelson/ Twitter)

Kisan Diwas 2018 भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग  (Chaudhary Charan Singh) यांचा वाढदिवस (23 डिसेंबर)  राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. देशभरामध्ये आज शेतकरी म्हणजेच आपला अन्नदाता करत असलेल्या मेहनतीला कृतज्ञता व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंग यांनी भरीव कामगिरी केली आहे.  राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक  (नाबार्ड) यांची स्थापना त्यांनी केली. अटल  बिहारी वाजापेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली  चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला.

पश्चिम रेल्वेकडून खास अभिवादन 

 

"जय जवान-जय किसान" असा नारा देणाऱ्या भारतामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे. नैसर्गिक आपत्ती असेल किंवा राजकीय निष्क्रियता यामुळे देशभरात शेतकऱयांमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढत आहे. यावर तोडगा काढताना शेतकऱयांना प्रशासनाकडून मदत मिळणं जितकं महत्त्वाचं आहे तितकीच समाजातील प्रत्येक भारतीयाने शक्य होईल त्या स्वरूपात शेतकऱयांना मदतीचा हात देणं आज काळाची गरज बनली आहे.